इंदूर: राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा (Bharat jodo yatra)सध्या महाराष्ट्रात ( Maharashtra) असून ही यात्रा पुढे मध्यप्रदेशात जाणार आहे. सावरकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं असताना मध्यप्रदेशमधून (Madhya Pradesh) राहुल गांधींना (Rahul Gandhi) जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. राहुल गांधी इंदूरमध्ये येताच त्यांना बॉम्बने (bomb) उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. तसेच भारत जोडो यात्रेतील पोलिसांचा बंदोबस्तही वाढवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Big News: We will bomb Indore as soon as Rahul Gandhi arrive; Death threat to Rahul Gandhi )
अधिक वाचा : बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप...एटीएमवरदेखील होणार परिणाम
एका मिठाईच्या दुकानात पत्रं पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून अज्ञात इसमाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान येत्या 24 तारखेला राहुल गांधी यांची यात्रा मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोहचणार आहे. देशभरात राहुल गांधींच्या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, त्यात धमकी मिळाल्यानं यात्रेवर संकट निर्माण झाले आहे. मध्यप्रदेश पोलीस दल या पत्राचा शोध घेत आहे. हे पत्रं कुणी दिलं? पत्रं कधी आणून ठेवलं याचा तपास केला जाणार आहे. परंतु पोलिसांच्या हाती अद्याप कोणतीच माहिती लागलेली नाही.
अधिक वाचा : शिवसेना परत भाजपकडे मैत्रीची साद घालणार का?
दरम्यान, राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात आहे. त्यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हजारो लोक स्वत:हून या रॅलीत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्याकडे तक्रारीही देत आहेत. तसेच त्यांना पाठिंबाही देत आहेत. या रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधान केलं आहे. सावरकर हे ब्रिटिशांची पेन्शन घेत होते. त्यांनी माफीनामा दिल्यानेच त्यांना सोडण्यात आलं, असं सांगत राहुल गांधी यांनी कागदपत्रच मीडियासमोर सादर केली. त्यामुळे त्यांच्यावर भाजप आणि मनसेने जोरदार टीका केली आहे.
मनसेने तर राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपनेही ठिकठिकाणी आंदोलन करत राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे. असं असतानाच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.