LPG Cylinder Price : स्वयंपाक गॅसबाबत मोठा दिलासा, जाणून घ्या LPG सिलेंडर 500 रुपयांना कोण आणि कसे घेऊ शकणार

LPG Cylinder Price: स्वयंपाकाच्या गॅसवर मोठा दिलासा, जाणून घ्या LPG सिलेंडर 500 रुपयांनाकोणाला आणि कसा मिळणार

Big relief regarding cooking gas, know who and how will be able to take LPG cylinder for Rs 500
LPG Cylinder Price : स्वयंपाक गॅसबाबत मोठा दिलासा, जाणून घ्या LPG सिलेंडर 500 रुपयांना कोण आणि कसे घेऊ शकणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गॅसच्या दरात वाढ झाल्याने लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे
  • महाराष्ट्रात 14.2 किलो एलपीजीची किंमत 1052.50 रुपये आहे.
  • स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा लाभ तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये घेऊ शकता

मुंबई : काही दिवसांपासून स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ झाल्याने लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सध्या स्वयंपाकाच्या गॅसची किंमत 1 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्लीत 14.2 किलो एलपीजीची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि कोलकात्यात 1079 रुपये आहे. पण, तुम्ही ही महागडी किंमत टाळू शकता. (Big relief regarding cooking gas, know who and how will be able to take LPG cylinder for Rs 500)

अधिक वाचा : LIC ग्राहकांसाठी अलर्ट!, विमा कंपनी आता अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार नाही

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा लाभ तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये घेऊ शकता. हा लाभ तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत दिला जाईल. मात्र, हा लाभ त्याअंतर्गत पात्र असलेल्या लोकांनाच दिला जाईल. 

अधिक वाचा : Sextortion Case : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार Sextortion च्या जाळ्यात; काय आहे नेमकं प्रकरण

कोणत्या योजनेअंतर्गत 500 रुपयांना सिलिंडर मिळणार 

उज्ज्वला योजना योजनेंतर्गत 76 लाख कुटुंबांना 500 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार आहे. राजस्थान सरकारने आपल्या चालू कार्यकाळातील अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात 500 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार असल्याचे सांगितले. 2022 मध्येच, गेहलोत सरकारने सूचित केले होते की दारिद्र्यरेषेखालील (BPL) लोक एका वर्षात 500 रुपये दराने 12 सिलिंडर घेऊ शकतील.

अधिक वाचा : ऐकलं का ! 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेचं असेल बरं, Cow Hug Day नसेल; या कारणामुळे केंद्राने मागे घेतला निर्णय

कोणाला लाभ मिळेल

जर तुम्ही राजस्थान राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असाल, म्हणजे BPL श्रेणीत असाल तर तुम्हाला LPG सिलेंडरचा लाभ दिला जाईल. राजस्थानमध्ये दुसऱ्या राज्यातील नागरिक राहत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच लाभ दिला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी