Nupur Sharma : पैंगबर वाद प्रकरणी नुपूर शर्माला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, १० ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश

पैंगबर मोहम्मद वादाप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने नुपरची १० ऑगस्टपर्यंत अटक रोखली आहे. तसेच ज्या ज्या राज्यात नुपूरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्या राज्यांना नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

nupur sharma
नुपूर शर्मा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पैंगबर मोहम्मद वादाप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
  • कोर्टाने नुपरची १० ऑगस्टपर्यंत अटक रोखली आहे.
  • तसेच ज्या ज्या राज्यात नुपूरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्या राज्यांना नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे.

Nupur Sharma :  नवी दिल्ली : पैंगबर मोहम्मद वादाप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने नुपरची १० ऑगस्टपर्यंत अटक रोखली आहे. तसेच ज्या ज्या राज्यात नुपूरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्या राज्यांना नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. नुपूरच्या विरोधात जर नवा गुन्हा दाख झाला तर त्याविरोधात कुठलीही कारवाई होणार नाही. मोहम्मद पैंगबर वादानंतर नुपूर शर्माला खुप धमक्या मिळाल्याची माहिती नुपूरच्या वकिलांनी दिली आहे. नव्या याचिकेत नुपूर शर्माची अटक होऊ नये तसेच नवा गुन्हा दाखल होऊ नये अशी मागणी केली होती.

भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माविरोधात देशातील ८ राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्माविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. कोर्टाने सर्व एफआयआर एकत्र करण्यावर कोर्टाने राज्यांकडे उत्तर मागितले आहे.

 

केस ट्रान्सफर करण्याची नुपूरची मागणी

यापूर्वी अटक टाळण्यासाठी नुपूरने केस ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. परंतु १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माला कडक शब्दांत सुनावले होते. नुपूरला पुन्हा नव्याने धमक्या मिळाल्याने तिने पुन्हा अर्ज दाखल केला आहे. नुपूरच्या नव्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. एक जुलै रोजी न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि ‘न्यायमूर्ती सुर्यकांत निकाल देतील. या न्यायमूर्तींनीच नुपूरला खडे बोल सुनावले होते.   


बलात्कार आणि खुनाच्या धमक्या

नुपूर शर्माला पुन्हा बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नुपूरने पुन्हा याचिका दाखल केली आहे. तसेच ठिक ठिकाणी दाखल झालेल्या सर्व तक्रारी एकाच ठिकाणी घेण्याची मागणी नुपूरने केली आहे. नुपूरने नव्या याचिकेत म्हटले आहे की, १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणी नंतर आपल्याला पुन्हा बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळत आहेत. यापूर्वीच्या याचिकेतही नुपूरने अशा धमक्या मिळत असल्याचे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीत नुपूरने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे असे म्हटले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी