मुंबई : IRCTC दिवसागणिक चालत्या ट्रेनमध्ये मद्यपानाच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. केवळ प्रवाशीच नव्हे तर रेल्वे कर्मचारी देखील मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून भारतीय रेल्वे आणि IRCTC ने ट्रेनमध्ये मद्यपान करणाऱ्या लोकांवर अंकुश लावण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे. ज्यात IRCTC द्वारे कडक नियम आखण्यात आले असून, हा नियम केवळ प्रवाश्यांनाच नव्हे तर तिकीट तपासनीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनासुद्धा लागू करण्यात आला आहे. (Big step taken by Indian Railways against alcoholism read in marathi)
हे पण वाचा : Mumbai Crime: मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, 6 किलो केटामाईन ड्रग्ज जप्त
हाती आलेल्या माहितीनुसार, सध्या काही निवडक रेल्वे स्थानकांवरून मोहिम राबवली जाणार आहे. ग्वाल्हेर, प्रयागराज, कानपूर सेंट्रल येथून रेल्वेचा चेकिंग स्टाफ ट्रेनमध्ये चढतो. त्यामुळे ड्युटीसाठी साइन इन करण्यापूर्वीच जवळपासच्या अनेक स्थानकांवर रेल्वेच्या चेकिंग स्टाफची ब्रीथ एनलायजर टेस्ट केली जाणार आहे. शिवाय लोको पायलट, ट्रेन मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांचीही चालत्या ट्रेनमध्ये अचानकपणे ब्रिथ एनलायजर टेस्ट केली जाईल. तसेच या स्थानकांमधून जाणाऱ्या विरांगना लक्ष्मीबाई झाशी, आग्रा कॅंट, मथुरा, ग्वाल्हेर या गाड्यांचीही रेल्वेच्या चेकिंग स्टाफकडून अचानकपणे तपासणी केली जाणार आहे.
हे पण वाचा : Maharashtra Rain Updates:मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, महाराष्ट्रात अजून किती दिवस होणार पाऊस?
गेल्या आठवड्यात अमृतसरहून कोलकाता मार्गे लखनऊला जाणाऱ्या अकाल तख्त एक्स्प्रेसमध्ये टीटीईने महिलेच्या डोक्यात लघवी केली होती. टीटीई त्यावेळी दारूच्या नशेत होता आणि रजेवर होता. या घटनेची दखल घेत रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांच्या आदेशानुसार टीटीई कर्मचारी मुन्ना कुमार ला बडतर्फ करण्यात आले आहे.
अशीच एक घटना बंगळुरू रेल्वे स्थानकावर देखील घडली होती. मद्यधुंद तिकीट तपासकाने एक महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याची घटना देखील समोर आली आहे. रेल्वे प्रवासामध्ये अश्या लाजिरवाण्या घटना वारंवार घडू नयेत म्हणून चालत्या गाड्यांमध्ये आणि ड्युटी सुरू करण्यापूर्वी चेकिंग स्टाफचे ब्रीथ एनालायझरने तपासणी करण्याची व्यवस्था केली जात आहे. तसेच, चालत्या ट्रेनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची ब्रीथ एनालायझरच्या सहाय्याने अचानक तपासणी केली जाणार आहे. ज्यामुळे, कर्मचारी कामावर मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
हे पण वाचा : OTT ओटीटीवरील अश्लील कंटेटवर अनुराग ठाकुर म्हणाले, 'रचनेच्या नावाखाली गैरवर्तणूक आणि असभ्यपणा सहन केला जाणार नाही'
रेल्वे प्रवाश्यांसोबत चांगले वर्तन आणि फ्रेंडली होण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांपासून चेकिंग स्टाफ, गार्ड, लोको पायलट, स्टेशन स्टाफ, बुकिंग क्लार्क तसेच रेल्वेचे फ्रंटलाइन स्टाफपर्यंत सर्वांना प्रवाश्यांसोबत चांगले वर्तन करण्याचे धडे दिले जाणार आहेत.