वाधवान बंधू आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ३४,६१५ कोटींच्या बँक घोटाळ्यातले प्रमुख आरोपी

biggest bank fraud case of India booked by Central Bureau of Investigation : सीबीआयने दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे संचालक कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि इतर यांच्या विरोधात १७ बँकांची ३४ हजार ६१५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

biggest bank fraud case of India booked by Central Bureau of Investigation
वाधवान बंधू आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ३४,६१५ कोटींच्या बँक घोटाळ्यातले प्रमुख आरोपी 
थोडं पण कामाचं
  • वाधवान बंधू आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ३४,६१५ कोटींच्या बँक घोटाळ्यातले प्रमुख आरोपी
  • मुंबईत बारा ठिकाणी धाड टाकून CBI तपास सुरू
  • यूनियन बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षतेखालील कंसोर्टियमची आर्थिक फसवणूक करून ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

biggest bank fraud case of India booked by Central Bureau of Investigation : नवी दिल्ली : सीबीआयने दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे संचालक कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि इतर यांच्या विरोधात १७ बँकांची ३४ हजार ६१५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा भारतात झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक गुन्हा आहे. याआधी एबीजी शिपयार्ड कंपनी विरोधात २३ हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सीबीआयने ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्याप्रकरणी मुंबईत बारा ठिकाणी आज (बुधवार २२ जून २०२२) धाड टाकून तपास केला. सीबीआयने दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे संचालक कपिल वाधवान, धीरज वाधवान, सुधाकर शेट्टी, अमेरीलिस रियल्टर्स, स्कायलार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, दर्शन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, एसओबी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, टाउनशिप डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, शिशिर रिअॅल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर या सर्वांविरोधात यूनियन बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षतेखालील कंसोर्टियमची आर्थिक फसवणूक करून ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सीबीआयने ११ फेब्रुवारी २०२२ रोजी बँकेने केलेल्या तक्रारी प्रकरणी तपास सुरू करून गुन्हा दाखल केला आहे. याआधी यस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी वाधवान बंधूंविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला. सप्टेंबर २०२१ मध्ये पिरामल कॅपिटल हाउसिंग फायनान्स कंपनीने ३४ हजार २५० कोटींचा व्यवहार करून डीएचएफएल ताब्यात घेतली. पण याआधी डीएचएफएलने ३४ हजार ६१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवून सीबीआयने एफआयआर केली आहे.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची १४३ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. स्टर्लिंग बायोटेक कंपनीच्या संदेसरावर १६ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर विजय मल्ल्यावर बँकांची ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने लाच प्रकरणात बायोकॉन बायोलॉजिक्स कंपनीचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट एल प्रवीण कुमार यांना अटक केली आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी