Nitish Kumar : पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भाजपने जातीनिहाय जनगणनेबद्दल आपली भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु नितीश कुमार यांनी या प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. नितीश कुमार यांनी जरी सर्वपक्षीय बैठक बोलावली असली तरी अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. २७ मे रोजी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
An all-party meeting will be convened to take everyone's opinions about caste-based census. Then the proposal will be presented before the state cabinet. Talks happened with some parties for conducting the meeting on 27 (May) but awaiting response from some: Bihar CM Nitish Kumar pic.twitter.com/C000IP6W1M — ANI (@ANI) May 23, 2022
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, आम्ही जातीनिहाय जनगणनेवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांसोबत सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेऊन कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणला जाईल असे कुमार म्हणाले. तसेच बिहार विधानसभेत जातीनिहाय जनगणनेवर दोन वेळा प्रस्ताव पास करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
भाजपने जातीनिहाय जनगणनेवर अद्याप कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. नितीश कुमार यांच्या सर्वपक्षीय बैठकीवर उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद म्हणाले की यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ. भाजप यावर विचार करत आहे असेही प्रसाद म्हणाले. तसेच यापूर्वी कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी जातीनिहाय जनगणनेला विरोध केला आहे. जातीनिहाय जनगणनेवरून जेडीयु आणि भाजपमध्ये एकमत नाहे असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.