sushant singh case: मुंबईत आयपीएस विनय तिवारी यांच्यासोबत झाले ते ठीक नाही, नीतिश कुमार

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 03, 2020 | 15:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

sushant singh rajput: सुशांत सिंह प्रकरणात मुंबईला आलेल्या पाटणाचे एसपी आयपीएस विनय तिवारी यांना मुंबईमध्ये जबरदस्तीने क्वारंटाईन करण्यात आले. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

sushant singh rajput
'मुंबईत आयपीएस विनय तिवारी यांच्यासोबत झाले ते ठीक नाही' 

थोडं पण कामाचं

  • बिहार पोलीसांचे एसपी विनय तिवारी यांना मुंबईत केले क्वारंटाईन
  • बिहारचे नितीश कुमार बोलले, विनय तिवारी यांच्यासोबत जे झाले ते ठीक नाही
  • सुशांत प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेत एसपी

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या(sushant singh suicide case) प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी(bihar ips officer) जेव्हा मुंबईत पोहोचले तेव्हा बीएमसीने(bmc) त्यांना जबरदस्तीने क्वारंटाईन(quarantine) केले. विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या संपूर्ण घटनेवर आता बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीश कुमार यांनी स्पष्ट म्हटलेय की, पटना सिटीचे एसपी विनय तिवारी यांच्यासोबत मुंबईत जे झाले ते योग्य नाही. खरतर, विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर मुंबई आणि बिहार पोलीस आमनेसामने आलेत. 

मीडियाने जेव्हा नितीश कुमार यांना विनय तिवारी यांना जबरदस्ती क्वारंटाईन केल्याबाबतचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आमच्या सरकारकडून डीजीपीने संपूर्ण सूचना दिली आहे. त्यासोबतच विनय तिवारी यांच्यासोबत जे काही घडले ते योग्य झाले नाही. ते याबाबत बोलतील. हा राजकीय विषय नाही. बिहार पोलिसांच्या प्रती जी काही कायदेशीर जबाबदारी आहे ती आम्ही निभावत आहोत. अशाच परिस्थितीत आमचे डीजीपी त्यांच्याशी बातचीत करत आहेत. 

निरूपम यांची टीका

विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर काँग्रेस नेता संजय निरूपम यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लगता है, #BMC और मुंबई पुलिस पगला गए हैं। सुशांत सिंह मृत्यू कांड की जाँच करने आए IPS अफसर तिवारी को 15 अगस्त तक क्वारंटीन  कर दिया।जाँच कैसे होगी? मुख्यमंत्री तत्काल हस्तक्षेप करें।तिवारी को रिलीज कराएँ और जाँच में मदद करें वरना मुंबई पुलिस पर शक और बढ़ेगा।

बिहारच्या डीजीपीने केले हे विधान

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेशवर पांडे यांनी रविवारी आरोप लावला की तिवारी यांना मुंबईत बीएमसीने जबरदस्ती क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले. पांडे यांनी ट्वीट केले, आयपीएस अधिकारी विनय तिवारी पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करणयासाठी अधिकृतरित्या पाटणा येथून मुंबईला पोहोचले होते, मात्र बीएमसीच्या अधिकाऱ्यांना रात्री ११ वाजता त्यांना जबरदस्ती क्वारंटाईन कले. गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी