Jitan Ram Manjhi : मी रामाला मानत नाही, राम काल्पनिक व्यक्ती, बिहारचे माजी मुख्यमंत्री मांझी यांचे वादग्रस्त वक्तव्य

आम्ही रामाला मानत नाही, राम काल्पनिक होता आणि लोक त्याची पूजा करतात असे वादग्रस्त विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान आवाम पक्षाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी केले आहे. तसेच आपल्या वक्तव्यात त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दलही अपशब्द काढला आहे. bihar ex chief minister Jitan Ram Manjhi controvercial statement on lord ram and Brahmin community

Jitan Ram Manjhi
जीतनराम मांझी 
थोडं पण कामाचं
  • राम काल्पनिक असे वादग्रस्त विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री मांझी यांनी केले आहे.
  • आम्ही आंबेडकरांचे नालायक वारस आहोत
  • ब्राह्मणांमबद्दल अपशब्द

Jitan Ram Manjhi : पाटणा : आम्ही रामाला मानत नाही, राम काल्पनिक होता आणि लोक त्याची पूजा करतात असे वादग्रस्त विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान आवाम पक्षाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी केले आहे. तसेच आपल्या वक्तव्यात त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दलही अपशब्द काढला आहे. पाटण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. (bihar ex chief minister Jitan Ram Manjhi controvercial statement on lord ram and Brahmin community)

मांझी म्हणाले की भगवान रामवर आमचा विश्वास नाही, भगवान राम काल्पनिक आहे लोक त्यांची मूर्तीची पूजा करतात त्यावर श्रद्धा ठेवतात. रामायण लिहिली गेली आहे. त्यातील अनेक वाक्य आम्ही वाचली आहेत, त्यावर आम्ही चर्चाही करतो. परंतु भगवान रामावार आमचा विश्वास नाही. तसेच आमचे बांधव जय भीम बोलतात परंतु आम्हाला माफ करा आम्ही आंबेडकरांचे नालायक वारस आहोत, आम्ही फक्त त्यांच्या नावाचा जयजयकार करतो. १९५६ साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारला आणि त्यांचे निधन झाले, मृत्यूपूर्वी त्यांनी हिंदू धर्म सोडला असे मांझी म्हणाले. 


ब्राह्मंणाबद्दल अपशब्द

आज काल गरीब लोक खूप धार्मिक झाले आहेत असे मांझी म्हणाले. पूर्वी सत्यनारायण पूजेचे आम्ही नावही ऐकले नाही. परंतु आजकाल अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजा होताना दिसते आणि आमचे लोक या पुजेत सहभागी होतात असे म्हणून त्यांनी ब्राह्मणांमबद्दल अपशब्द काढला.  

नंतर स्पष्टीकरण

ब्राह्मणांबद्दल अपशब्द काढल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. आपण अपाल्या समाजावर टीका केली. ब्राह्मण साजमाबद्दल आपण काही बोललोच नाही, जर कुणाचा गैरसमज झाला असेल तर त्याबाबत आपण माफी मागतो असे मांझी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी