बिहार पूर: गावे झाली जलमय, लोकांचे हाल

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 22, 2019 | 08:46 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पुरामुळे भीषण परिस्थिती आली आहे. दरभंगा जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली आहेत

bihar flood
बिहार पूर  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • बिहारमध्ये भयानक पूरपरिस्थिती
  • पुरामुळे लोकांचे प्रचंड हाल
  • अनेक गावांना फटका

पाटणा: बिहारमधील अनेक जिल्ह्यांना पुराने वेढा घातला असून तेथील परिस्थिती भीषण झाली आहे. दरभंगा जिल्ह्यातील काही फोटोज समोर आले आहेत. या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने तेथील लोकांना आपले घर सोडून रेल्वे ट्रॅकवर राहवे लागत आहे. ते रोजच्या जीवनात नरकयातना भोगत आहेत. घरात इतके पाणी भरले आहे की ते तिथे राहू शकत नाहीत.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार एक आठवड्याहून अधिक काळ झाला आमच्या घरात पुराचे पाणी भरले आहे. त्यामुळे आम्हाला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला रहावे लागत आहे. आतापर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. 

दरभंगातील गोपाळपूर गावातील लोकांना आश्रय मिळत नसल्याने त्यांना आभाळाखालीच रहावे लागत आहे. बिहारमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत. पूर येण्यामागे हे मोठे कारण आहे. बिहारमध्ध्ये विविध पुरांच्या घटनांमध्ये आतापर्यंत ९७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाखाहून अधिक लोकांना शिविरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. 

बिहार आणि आसाममध्ये पुराची स्थिती भयानक झाली आहे. पूर्वेकडील या दोनही राज्यात पुरामुळे तब्बल १.११ कोटी लोकांना फटका बसला आहे. तर रविवारी या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६६ इतकी झाली आहे. बिहारमध्ये पुरामुळे १२ जिल्हे प्रभावित झाले असून आसामच्या ३३ जिलह्यामधी १८ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या ३८.३७ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. 

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील लोकांच्या मृत्यूमुखी पडल्याची सूचन मिळाली आणि यासोबतच जिल्ह्यात मरणाऱ्या व्यक्तींचा आकडा वाढून २३वर पोहोचला. सीतामढीमध्ये पुरामुळे तब्बल २७ लोकांचा जीव गेला आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सीतामढी आणि दरभंगा जिल्ह्यातील मदतकार्य करणाऱ्या शिबिरांना भेट दिली.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी