Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपला हादरवलं

Bihar Political Crisis: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपशी असलेली युती तोडत नितीश कुमार राजदच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन करणार आहेत.

bihar political crisis political earthquake nitish kumar resigned as chief minister big blow to bjp
नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपला हादरा  |  फोटो सौजन्य: IANS
थोडं पण कामाचं
  • बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप
  • नितीश कुमारांनी भाजपशी युती तोडली, एनडीएमधूनही पडले बाहेर
  • नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Nitish Kumar Bihar Politics News: पटना: बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपला (BJP) जोरदार हादरा दिला आहे. साधारण चार वर्षापासून असलेली भाजप-जनता दल (युनायटेड) युती आता तुटली आहे. कारण नितीश कुमार यांनी दुपारी चार वाजता राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन आपला मुख्यमंत्रीपदाचा (Cheif Minister) राजीनामा (Resigned) दिला आहे. 

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सुपूर्द केले आणि नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्याचवेळी बिहारच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, आपण एनडीएमधून देखील बाहेर पडावे यावर सर्व खासदार आणि आमदारांचे एकमत होते.

अधिक वाचा: Bihar Political Crisis :  बिहारमध्ये भाजप जदयूची युती तुटली, नितीश कुमार घेणार राज्यपालांची भेट

RJD च्या नितीश कुमारांकडे तीन मागण्या

मंगळवारी RJD आणि JD-U या दोघांनी त्यांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीला डावे नेतेही उपस्थित होते. आरजेडीने नितीश यांना पाठिंबा देण्यासाठी तीन अटी ठेवल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पहिली अट उपमुख्यमंत्री, दुसरी गृहमंत्रालय आणि तिसरी अट आरजेडी कोट्यातून स्पीकर करण्याची मागणी करण्यात आली आहे. बिहारमध्ये आरजेडीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन होत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अधिक वाचा: बिहारमध्ये राजकीय भुकंपाची शक्यता वाढली, मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

नितीश कुमार आणि भाजपमधील अंतर वाढलं

काही काळापासून नितीश कुमार आणि भाजपमधील अंतर वाढले आहे. नितीश कुमार हे नीती आयोगाच्या बैठकीला अनुपस्थित असल्याचं समजताच राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चांना सुरवात झाली होती. ज्याची परिणिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे. 

अधिक वाचा: Nitish Kumar : नितीश कुमार यांचा मित्र पक्ष भाजपला खो, जातीनिहाय जनगणेवर बोलावली सर्वपक्षीय बैठक

दरम्यान, नितीश कुमार यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पण अग्निपथ योजना, लोकसंख्या कायदा आणि जातिगणना यासारख्या मुद्द्यांवर भाजप आणि जेडीयमध्ये मतभिन्नता होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन अखेर नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बिहारमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नितीश कुमार यांनी हालचाली देखील सुरु केल्या. कारण राजीनामा देताच नितीश कुमार हे माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी पोहोचले.

नवं सरकार स्थापन करण्याचा दावा 

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सुपूर्द केले आणि नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. बिहारच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, सर्व खासदार आणि आमदारांचे एकमत होते की आपण एनडीएमधून बाहेर पडावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी