बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचा भीषण अपघात, बंगालमध्ये रेल्वे रुळावरून घसरल्याने 8 ठार, 45 जखमी

NFR च्या अलीपुरद्वार विभागाच्या अंतर्गत भागात संध्याकाळी 5 च्या सुमारास हा अपघात झाला. अलीपुरद्वार जंक्शनपासून ९० किलोमीटरहून अधिक अंतरावर बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. आतापर्यंत किमान 50 जखमींना वाचवण्यात यश आले आहे. तर 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Bikaner-Guwahati Express crash kills 8, injures 45 in Bengal
बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचा भीषण अपघात, बंगालमध्ये रेल्वे रुळावरून घसरल्याने 8 ठार, 45 जखमी  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळ रेल्वे अपघात झाला आहे.
  • बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या आहेत.
  • रुळावरून घसरलेल्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे

गुवाहाटी : पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळ रेल्वे अपघात झाला आहे. येथे बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसच्या 12 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 45 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज सकाळी घटनास्थळी पोहोचणार आहेत. रेल्वे अपघातानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांचे विदारक चित्र समोर आले आहे. (Bikaner-Guwahati Express crash kills 8, injures 45 in Bengal)

पश्चिम बंगाल सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान 50 जखमींना वाचवण्यात यश आले आहे. तर 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 24 जणांना जलपाईगुडी जिल्हा रुग्णालयात तर 16 जणांना मोयनागुरी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. न्यू फ्रंटियर रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, गंभीर प्रवाशांना सिलीगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात येणार आहे.

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुळावरून घसरलेल्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त होत असून खराब झालेले डबे कापण्यासाठी गॅस कटरचा वापर केला जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील न्यू दिमोहनी आणि न्यू मयनागुरी रेल्वे स्थानकांदरम्यान संध्याकाळी ५ वाजता हा अपघात झाला, जेव्हा ट्रेन क्रमांक १५६३३ बिकानेरहून गुवाहाटीला जात होती. ही ट्रेन बुधवारी बिकानेर जंक्शनहून निघाली होती आणि गुरुवारी संध्याकाळी गुवाहाटीला पोहोचणार होती. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर गंभीर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ट्विट केले की, "आज संध्याकाळी न्यू मायागुरी (पश्चिम बंगाल) जवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. वेगवान बचाव कार्यासाठी मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

अपघात स्थळावरील व्हिडिओ फुटेजमध्ये एलिव्हेटेड ट्रेन ट्रॅकच्या शेजारी पडलेल्या अनेक खराब झालेल्या ट्रेनच्या डब्यांच्या ढिगाऱ्यातून लोकांना वाचवण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी स्थानिक लोक आणि इतर प्रवाशांसह मदत आणि बचाव कार्यात मदत करताना दिसतात.


कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून अपघाताची माहिती घेतली. बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली. बॅनर्जी यांनी या संदर्भात जलपाईगुडीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे.

भारतीय रेल्वेने मृतांसाठी 5 लाख रुपये, गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 25,000 रुपये मदत जाहीर केली आहे.


रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेन लाइनवर झालेल्या अपघातामुळे गुवाहाटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या तात्काळ थांबवण्यात आल्या आहेत.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी