पाकिस्तानमध्ये घराणेशाही; भुत्तो पुत्र झाला परराष्ट्रमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री झाल्या परराष्ट्र राज्यमंत्री

Bilawal Bhutto Zardari takes oath as Pakistan  youngest Foreign Minister : कधी बेनझीर भुत्तो तर कधी नवाझ शरिफ यांनाच वझिर ए आझम अर्थात पंतप्रधान या पदावर बघणाऱ्या पाकिस्तानमध्ये राजकारणावर घराणेशाहीचे वर्चस्व आहे. हेच पुन्हा एकदा दिसून आले.

Bilawal Bhutto Zardari takes oath as Pakistan  youngest Foreign Minister
पाकिस्तानमध्ये घराणेशाही; भुत्तो पुत्र झाला परराष्ट्रमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री झाल्या परराष्ट्र राज्यमंत्री  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानमध्ये घराणेशाही; भुत्तो पुत्र झाला परराष्ट्रमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री झाल्या परराष्ट्र राज्यमंत्री
  • बिलावल भुत्तो हे ३३ वर्षांचे
  • माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र

Bilawal Bhutto Zardari takes oath as Pakistan  youngest Foreign Minister : इस्लामाबाद : कधी बेनझीर भुत्तो तर कधी नवाझ शरिफ यांनाच वझिर ए आझम अर्थात पंतप्रधान या पदावर बघणाऱ्या पाकिस्तानमध्ये राजकारणावर घराणेशाहीचे वर्चस्व आहे. हेच पुन्हा एकदा दिसून आले. यावेळी नवाझ शरिफ यांचे बंधू शहबाझ शरिफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. शहबाझ शरिफ यांच्या सरकारमध्ये बिलावली अली भुत्तो हे परराष्ट्रमंत्री आहेत. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार या शहबाझ शरिफ यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत.

बिलावल भुत्तो झरदारी हे ३३ वर्षांचे आहेत. ते पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र आहेत. तसेच ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी बिलावल भुत्तो यांनी इंग्लंडमध्ये जाऊन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेअंती बिलावल भुत्तो यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला.

बिलावल भुत्तो यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना त्यांना शपथ दिली. याप्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरिफ आणि मान्यवर उपस्थित होते. याआधी ११ एप्रिल २०२२ रोजी शहबाझ शरिफ यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

संसदेत बहुमत गमावल्यामुळे इमरान खान यांचे सरकार पडले. यानंतर शहबाझ शरिफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. शहबाझ शरिफ यांच्या मंत्रिमंडळात आज (बुधवार २७ एप्रिल २०२२) बिलावल भुत्तो यांचा समावेश झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी