Drug business: कोट्यावधी डॉलर्सचा आहे नशा बाजार, जाणून घ्या कसा आहे जगाचा ड्रग्सचा कारभार

ड्रग्स हे शरीराला फक्त वाळवीसारखे कुरतडत नाहीत, तर अनेक पिढ्या संपवून टाकतो. मॅक्सिकोमधल्या रस्त्यांवर ड्रग्सच्या तस्करांची इतकी दहशत आहे की काहीवेळा तिथे रक्त तर कधी कापलेली शिरे लटकलेली आढळतात.

Drug business
कोट्यावधी डॉलर्सचा आहे नशेचा बाजार, जाणून घ्या कसा आहे जगाचा ड्रग्सचा कारभार 

थोडं पण कामाचं

  • ड्रग्सचे व्यसन एका व्यक्तीलाच नव्हे, तर त्याच्या अनेक पिढ्या उध्वस्त करते
  • मॅक्सिकोच्या रस्त्यांवरही आहे ड्रग्स तस्करांची प्रचंड दहशत, अनेकदा होते हिंसा
  • सिनालोआ कार्टेल जगातील सर्वात मोठ्या ड्रग्स-तस्करी संघटनांपैकी एक आहे

ड्रग्स (Drugs) हा शब्द लिहिताना आणि बोलताना जितका छोटा आहे तितकाच विध्वंस तो माजवतो. ड्रग्स शरीरात (drug consumption) जाताच नसानसांपर्यंत पोहोचून माणसाला जनावर बनवतात. ते माणसाला आपल्या कब्जात घेतात आणि हळूहळू माणसाला त्याचे व्यसनच (drug addiction) लागते. जगात असे अनेक देश आहेत जिथे ड्रग्सवरून युद्धे (drug wars) होतात. रस्त्यांवर ड्रग्स तस्कर (drug smugglers) आपली दहशत पसरवतात. हा नशेचा व्यापार कोट्यावधी डॉलर्सचा (billion dollars trade) आहे. जाणून घेऊया या काळ्या दुनियेतल्या ड्रग्स कार्टेलबद्दल (drug cartels).

मॅक्सिकोच्या रस्त्यांवरही आहे ड्रग्स तस्करांची प्रचंड दहशत, अनेकदा होते हिंसा

उत्तर अमेरिकेतील मॅक्सिको या देशात खुलेआम ड्रग्सवरून हिंसा आणि युद्धे होतात. ड्रग्स तस्करांची ही टोळीयुद्धे रस्त्यावर पाहायला मिळतात. कधी लोकांची कापलेली शिरे बाजारात लटकलेली आढळतात तर कधी रक्ताचे पाट वाहतात. मॅक्सिकोमध्ये ड्रग्स कार्टेलने देशाच्या मोठ्या भागाला आपल्या तडाख्यात घेतले आहे. इथे एकच नव्हे तर अनेक समूह आहेत.

सिनालोआ कार्टेल- अमेरिकी सरकारने सिनालोआ कार्टेल ही जगातील सर्वात मोठ्या ड्रग्स-तस्कर संघटनांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. एल. चापो हा या संघटनेचा म्होरक्या होता. ड्रग्सच्या जगात त्याने इतके पैसे कमावले की तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. त्याच्या नावावर फक्त मॅक्सिकोतच नव्हे, तर जगभरात ड्रग्सचा पुरवठा होत असे. २०१४मध्ये चापोला अटक करण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चापोने न जाणो किती पिढ्या उध्वस्त केल्या आहे.

जालिस्को न्यू जनरेशन (CJNG)- २०१०मध्ये तयार झालेली ही टोळी सिनालोआ कार्टेलची मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आली. आश्चर्याची गोष्ट ही की या टोळीची सुरुवात इतर कोणी नाही, तर एका माजी पोलीस अधिकाऱ्याने केली. अमेरिकी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही टोळी देशात आणि देशाबाहेरही सिंथेटिक ड्रग्स पुरवते. अमेरिका, युरोप आणि आशियाच्या बाजारात हिचा मोठा दबदबा आहे.

गल्फ कार्टेल- ही मॅक्सिकोतील सर्वात जुन्या अपराधिक संघटनांपैकी एक आहे. अमेरिकेत कोकेन आणि मॅरुआनाच्या तस्करीसाठी ही संघटना ओळखली जाते. ड्रग्सच्या दुनियेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि युवा पिढ्यांच्या नसांमध्ये हे ड्रग्स पोचवण्यासाठी ही संघटना इतर अनेक संघटनांच्या मदतीने काम करत आहे.

लॉस झेटास- या गुन्हेगारी टोळीची सुरुवात १९९७मध्ये मॅक्सिकन स्पेशल फोर्सेसच्या ३१ माजी संचालकांनी केली. सुरुवातीला या टोळीने गल्फ कार्टेलसोबत काम केले, पण नंतर स्वतंत्र संघटना म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या समूहाने फक्त ड्रग्सची तस्करीच केली नाही, तर पुढे जाऊन खून आणि पैसे वसूलीतही सहभागी झाला.

बॉलिवुडचे तारेही ड्रग्सच्या नशेत धुंद

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवुड आणि ड्रग्स-तस्करांदरम्यानच्या संबंधांचा सातत्याने तपास केला जात आहे. एकीकडे सुशांतच्या मृत्यूचा तपास चालू आहे तर दुसरीकडे त्याच्या मृत्यूशी जोडल्या गेलेल्या ड्रग्सच्या पैलूचीही चौकशी केली जात आहे. मोठ्या मोठ्या बॉलिवुड तारे-तारकांची नावे यात समोर येत आहे. या तपासाचे अनेक पैलू समोर येणे अद्याप बाकी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी