Bipin Rawat Funeral : CDS बिपीन रावत यांचं पार्थिव सायंकाळपर्यंत विशेष विमानानं दिल्लीत आणणार, उद्या दुपारी अंत्यसंस्कार

CDS Bipin Rawat Last Rites: देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झाले आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.

Bipin Rawat Funeral :
उद्या दुपारी CDS बिपीन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला.
  • पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झाले.
  • उत्तराखंड सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

CDS Bipin Rawat Last Rites: नवी दिल्ली: देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झाले आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. विशेष विमानाने (Special Plane) बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणले जाईल. दोघांवर उद्या 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंट (Delhi Cantonment) मध्ये अंत्यसंस्कार (Funeral) केले जातील. बिपीन रावत यांच्या निधनामुळे उत्तराखंड सरकारने (Government of Uttarakhand) राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

बिपीन रावत यांचे पार्थिव विमानानं दिल्लीला आणणार

सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत एका सैन्यदलाच्या विमानाने राजधानी दिल्लीमध्ये आणले जाईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रावत यांची छोटी बहीण आणि भाऊ उपस्थित राहणार आहेत. 

उत्तराखंडमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. रावत यांच्या निधनाने दु: ख झाले आहे. रावत यांनी देशासाठी जीवन समर्पित केल्याचं धामी म्हणाले. संपूर्ण उत्तराखंड बिपीन रावत यांच्याकडे अभिमानाने पाहत असे. त्यांची सीडीएस म्हणून नियुक्ती झाली तेव्हाही त्यांच्या गावातील नागरिकांनी जल्लोष केला होता. जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बनवल्यानंतर त्यांच्या मूळ गावी सैन येथील लोकांनी आनंद व्यक्त केला होता. 

बिपीन रावत यांना दोन मुली

बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांना दोन मुली आहेत. एका मुलीचे नाव कृतिका रावत आहे. बिपिन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह देखील सैन्य दलात होते. 

नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दोन मिनिटे मौन पाळत त्यांना आदरांजली दिली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सितारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते.

कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत? 

  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती. 
  • बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
  • बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.
  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले. 
  • रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.
  • सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी