Bird Flu 'बर्ड फ्लू'चे थैमान, केरळमध्ये मारली १२ हजार बदके, अंड्यांच्या विक्रीवर बंदी

Bird flu cases in Kerala केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील थाकझी ग्राम पंचायतीच्या हद्दीत 'बर्ड फ्लू'ची दहा प्रकरणे समोर आली. संसर्ग पसरत असल्याची जाणीव होताच संपूर्ण परिसराला 'कंटेनमेंट झोन' जाहीर करुन तिथे येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली.

bird flu : 12000 ducks culled in Kerala's Alappuzha in view of cases
'बर्ड फ्लू'चे थैमान, केरळमध्ये मारली १२ हजार बदके, अंड्यांच्या विक्रीवर बंदी 
थोडं पण कामाचं
  • 'बर्ड फ्लू'चे थैमान, केरळमध्ये मारली १२ हजार बदके, अंड्यांच्या विक्रीवर बंदी
  • बर्ड फ्लू संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी अलप्पुझा जिल्ह्याचे प्रशासन सज्ज
  • ठार केलेल्या पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीत खोल खड्डा करुन पुरले

bird flu : 12000 ducks culled in Kerala's Alappuzha in view of cases अलप्पुझा: केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील थाकझी ग्राम पंचायतीच्या हद्दीत 'बर्ड फ्लू'ची दहा प्रकरणे समोर आली. संसर्ग पसरत असल्याची जाणीव होताच संपूर्ण परिसराला 'कंटेनमेंट झोन' जाहीर करुन तिथे येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली. बर्ड फ्लू आणखी पसरू नये म्हणून थाकझी ग्राम पंचायतीच्या हद्दीत १२ हजार बदके ठार करण्यात आली. अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. ज्या पक्ष्यांना बर्ड फ्लू झाल्याचे लक्षात आले त्यांचे नमुने शास्त्रोक्त पद्धतीन संकलित करुन पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 

बर्ड फ्लू संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी अलप्पुझा जिल्ह्याचे प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी करायच्या कृतीचे नियोजन केले आहे. ज्या भागात 'बर्ड फ्लू'ची प्रकरणे आढळली त्या भागात तसेच आसपासच्या परिसरात प्राणी-पक्षी, प्राण्यापक्ष्यांचे मांस, अंडी यांच्या विक्रीवर बंदी आहे. चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, वियापुरम, कारूवत्ता, थकाजी, पुरक्कड, अंबालापुझा साउथ, अंबालापुझा नॉर्थ, एदथ्वा पंचायत आणि हरिप्पड येथे ही बंदी लागू आहे.

ठार केलेल्या पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीत खोल खड्डा करुन पुरण्यात आले. खड्ड्यात औषधे टाकून नंतर खड्डा बुजवण्यात आला. नागरिकांना बर्ड फ्लू या आजाराच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी आवश्यक औषधांचे वाटप सुरू आहे.

बर्ड फ्लू आजाराचा संसर्ग थोपविण्यासाठी पशूपक्षी विभाग करत असलेल्या उपायांचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होत आहे. लवकरच बर्ड फ्लू नियंत्रणात येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी