वाढदिवसाच्या केक डिझाईनवरुन हाणामारी, एकाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 06, 2020 | 23:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Argument over Bithday Cake: वाढदिवसाच्या केकवरील डिझाईनवरुन एका गटाचा बेकरी कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. यानंतर झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

birthday cake design argument clash chennai bakery staff crime news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • दहा जणांच्या टोळक्याने बेकरीच्या दोन कर्मचाऱ्यांवर केला हल्ला 
  • हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी 
  • केकच्या डिझाईनवरुन झाला वाद

चेन्नई: तामिळनाडूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. वाढदिवसाच्या केकवरील डिझाईनवरुन झालेल्या वादानंतर एका टोळक्याने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण जखमी झाला आहे. ३१ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. या घटनेप्रकरणी सहा दिवसांनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. भारथ, उमा भारथ, प्रथाप, अजित आणि स्टॅलिन अशी आरोपींची नावे आहेत.

३१ डिसेंबर कुमारचा वाढदिवस होता. कुमारच्या वाढदिवसासाठी दोन तरुणांनी केकची ऑर्डर दिली. ज्यावेळी हे दोघे बेकरीत केक घेण्यासाठी पोहोचले त्यावेळी त्यांना बेकरी कर्मचाऱ्यांनी एक तास वाट पाहण्यास सांगितले. एक तास थांबण्यास सांगितल्याने त्या दोघांचा बेकरी कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कुमार आणि पुष्परंजन हे दोघेही केकवरील डिझाईनवरुनही नाराज होते. ज्यावेळी बेकरी कर्मचाऱ्यांनी त्यांना के दिला तेव्हा केक पाहून त्यांनी पुन्हा गरी परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर हे दोघेही घरी परतत असताना वाटेत त्यांना १० जणांच्या टोळक्याने अडवले. 

दहा जणांच्या टोळक्याने एरियापिल्लाईकुप्पम परिसरात कुमार आणि पुष्परंजन या दोघांना अडवले. आरोपींनी दोघांवर शस्त्राने हल्ला केला आणि त्यांना रस्त्यावर सोडून पळ काढला. यानंतर काहींनी कुमार आणि पुष्पराजन यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्परंजन याचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

पुष्परंजन याला उपचारासाठी स्टॅन्ली रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. तर अद्यापही पाच आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम प्रयत्न करत आहेत. तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी