Nagaland मध्ये भाजपच्या सरकारला राष्ट्रवादीने कसा पाठिंबा दिला? वाचा शरद पवार काय म्हणाले...

bjp ncp alliance : नागालँडमध्ये प्रथमच सर्वपक्षीय सरकार स्थापन होत आहे. म्हणजेच राज्यात एकही विरोधी पक्ष राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

bjp and ncp are together in Nagaland goverment
Nagaland मध्ये भाजप आघाडीला सरकार राष्ट्रवादीने कसा पाठिंबा दिला? वाचा शरद पवार काय म्हणाले...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीचं सरकार
  • भाजप सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा
  • पक्षाच्या निर्णयानंतर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई : नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीचे सरकार स्थापन होत आहे. प्रथमच सर्वपक्षीय सरकार स्थापन होत आहे. म्हणजेच नागालँडमध्ये एकही विरोधी पक्ष राहणार नाही. केंद्रात भाजपचे विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (bjp and ncp are together in Nagaland goverment)

अधिक वाचा : नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर शरद पवारांचा खुलासा, म्हणाले...

देशाच्या ईशान्य सीमेवरील नागालँड राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत विधानसभेच्या 60 पैकी एनडीपीपीने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपने १२, राष्ट्रवादीने ७, नॅशनल पिपल्स पार्टीने ५, रिपब्लिकन पक्षाने २, लोकजनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) 2, तर जेडीयूलाही 1 जागा मिळाली आहे.

अधिक वाचा : Asian Paint सोबतच 'हे' 5 स्टॉक्स तुम्हाला करु शकतात मालामाल

नागालॅंडमध्ये सरकार स्थापन्यासाठी कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी एनडीपीपी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत आहेत. यात एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि जेडीयू सत्तेत एकत्र येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजप आघाडी सरकारला पाठिंबा दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.

दरम्यान, शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, त्या राज्यातील एकंदर परिस्थिती पाहिल्यानंतर आमची मदत भाजपला नाही तर तेथील मुख्यमंत्र्यांना आहे. तेथील सरकारमध्ये स्थैर्य आणण्यासाठी आम्ही पाठिंबा देण्याची ही भूमिका घेतली आहे. पण राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या विरोधकांची एकत्र बैठक घेणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी