बंडखोरीमागे 'भाजप'चा हात असलेला Exclusive व्हिडिओ समोर 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा पुरावा असलेला एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी भाजप आपल्याला भविष्यात कसा पाठिंबा देणार याबद्दल उपस्थित ४१ आमदारांना सांगत होते. 

Breaking News
बंडखोरीमागे 'भाजप'चा हात असलेला Exclusive व्हिडिओ समोर  
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा पुरावा असलेला एका व्हिडिओ समोर आला आहे.
  • एकनाथ शिंदे यांनी भाजप आपल्याला भविष्यात कसा पाठिंबा देणार याबद्दल उपस्थित ४१ आमदारांना सांगत होते. 
  • विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये दाखल झाले.

गुवाहाटी :  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा पुरावा असलेला एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी भाजप आपल्याला भविष्यात कसा पाठिंबा देणार याबद्दल उपस्थित ४१ आमदारांना सांगत होते. 

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये दाखल झाले. त्यानंतसर त्यांनी भाजप शासित आसामची राजधानी गुवाहाटी येथील हॉटेल रॅडीसन ब्ल्यू येथे आपला मुक्काम हलविला. त्यानंतर या बंडामागे भाजप असल्याचा संशय सर्वांना होता. पण भाजपचा एकही नेता समोर आला नसल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर हा व्हिडिओ शिंदे गटाने प्रसिद्ध केला आहे. 

या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी एकमताने गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्व अधिकार दिल्याचा प्रस्ताव ठेवला त्यावर सर्व ४२ आमदार हात उंचावून त्यांना समर्थन देतात. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणतात, एकच आहे. जे काय सुख दु:ख आहे, ते आपल्या सगळ्यांचं एक आहे. काहीही असेल तरी आपण एकजुटीने, अगदी काहीही झालं तरी विजय आपलाच आहे. त्यानंतर कोणी तरी म्हणतं १ हजार टक्के.  मला तर तुम्ही जे म्हणालात, ते राष्ट्रीय पक्ष आहेत, ते महाशक्ती आहेत, त्यांनी अख्ख्या पाकिस्तान, म्हणजे काय परिस्थिती होती ते तुम्हाला माहित आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की, तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो ऐतिहासिक आहे. याच्या मागे आमची शक्ती आहे. तुम्हाला कधी काही लागलं तरी काही कमी पडू देणार नाही, याची प्रचिती तुम्हाला येईल.

 

पाहा काय म्हणाताहेत एकनाथ शिंदे व्हिडिओमध्ये 

एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केले जाहीर

एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जाण्याची त्यांची भूमिका पहिल्यांदाच या व्हिडीओच्या माध्यमातून बाहेर आली आहे. यात भाजपा ही महासत्ता असल्याचे सांगत, त्यांनी आपल्याला या बंडात काहीही कमी पडणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे परत शिवसेनेत येतील, ही आशा संपलेली दिसते आहे. संजय राऊत यांनी या आमदारांनी २४ तासांत परत यावे, त्यांनी दिलेल्या पर्यायावर विचार करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून शिंदे यांनी त्यांची पुढची वाटचाल स्पष्ट करुन टाकली आहे.

भाजपाही एक्शन मोडमध्ये फडणवीस दिल्लीला रवाना

आता एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आल्यानंतर, भाजपाचे नेतेही एक्टिव्ह झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. तिथे ते जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी चर्चा करुन ते शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. येत्या काळात सत्तेचा फॉर्म्युला नक्की होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात सत्ताबदलाचता मुहुर्त निघू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी