पोलीस स्टेशनसमोर भाजपच्या नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या 

West Bengal Bjp leader Murder: पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्ते नेत्यांवरील हल्ले काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. कारण काल (रविवार) रात्री  भाजपचे नगरसेवक मनीष शुक्ला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात

BJP_Leadek_Killed_in_Bengal
पोलीस स्टेशनसमोर भाजपच्या नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आणखी एका नेत्याची गोळ्या घालून हत्या
  • टीटागड येथील भाजप नेते मनीष शुक्ला यांची पोलीस ठाण्यासमोर गोळी झाडून हत्या
  • राज्यपालांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीजीपी यांना समन्स पाठविले

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आणखी एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. इथे रविवारी रात्री काही अज्ञात इसमांनी भाजप नेते मनीष शुक्ला यांची गोळ्या झाडून हत्या केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना टीटागड पोलीस ठाण्याच्या अगदी समोर घडली आहे. यावरुन आपण अंदाज बांधू शकता की, हे आरोपी किती निर्भयपणे हे कृत्य करत होते. दरम्यान, या घटनेनंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून, त्या दृष्टीने येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाजपने बंद पुकारला

मनीष शुक्ला यांच्या हत्येनंतर भाजपने पश्चिम बंगालमधील बॅरेकपूर येथे बंदची हाक दिली आहे. यापूर्वी शुक्रवारी दक्षिण 24 परगणा मधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. कारण भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी शेतकरी बिलाच्या समर्थनार्थ लाँग मार्च काढला होता. दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांवरुन भाजपने ममता बॅनर्जी सरकारला लक्ष्य केले आहे. भाजप नेते आणि पश्चिम बंगालचे भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावेळी याबाबत बोलताना ते असं म्हणाले की, 'प. बंगालमध्ये राजकीय हिंसाचार काही केल्या थांबत नाही. असे सांगत भाजप नेते आणि  यांनी व्हिडिओ जाहीर केला आणि या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. आज पुन्हा एकदा भाजपा कार्यकर्ते मनीष शुक्ला यांची टीएमसीच्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या  केली. ही घटना बॅरेकपूरमधील टीटागड पोलीस ठाण्याबाहेर घडली, परंतु पोलिस नेहमीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसले होते.' 

राज्यपालांनी बजावले समन्स

या घटनेनंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोमवारी सकाळी दहा वाजता राजभवनात बोलावले आहे. रविवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये राज्यपालांनी सांगितले की, 'टीटागड नगरपालिकेचे नगरसेवक मनिष शुक्ला यांची निर्घृण हत्या आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलविण्यात आली आहे.'

पक्ष कार्यालयात बसले होते मनिष शुक्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शुक्ला यांच्यावर रविवारी रात्री आठ वाजता गोळ्या झाडण्यात आल्या. जेव्हा ते आपल्या पक्ष कार्यालयात बसले होते. यावेळी काही दुचाकीस्वार येथे आले आणि त्यांनी थेट मनीष यांच्यावर गोळीबार केला. यावेळी गंभीररित्या जखमी झालेल्या मनीष यांना त्वरित बॅरेकपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना तात्काल ओपोलो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेपासून भाजप पश्चिम बंगाल सरकारवर हल्ला चढवत आहे आणि या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी