Bihar Political Crisis :  बिहारमध्ये भाजप जदयूची युती तुटली, नितीश कुमार घेणार राज्यपालांची भेट

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर बिहारमध्ये जदयू आणि भाजपची युती तुटली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यपालांची भेट घेणार असून बिहारमध्ये पुन्हा महागठबंधनचे सरकार स्थापन होणार आहे.

Breaking News
बिहारमध्ये भाजप जदयूची युती तुटली, नितीश कुमार घेणार राज्यपालांची भेट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिहारमध्ये जदयू आणि भाजपची युती तुटली आहे.
  • मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यपालांची भेट घेणार
  • बिहारमध्ये पुन्हा महागठबंधनचे सरकार स्थापन होणार आहे.

Bihar Political Crisis : पाटणा : महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर बिहारमध्ये जदयू आणि भाजपची युती तुटली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आज राज्यपालांची भेट घेणार असून बिहारमध्ये पुन्हा महागठबंधनचे सरकार स्थापन होणार आहे.

दिल्लीत नुकतीच निती आयोगाची बैठक पार पाडली होती. या बैठकीला बहुतांश राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, परंतु  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीला अनुपस्थित होते. तेव्हापासून भाजप आणि जदयुमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले होते.

नितीश कुमार यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी एनडीच्य उमेदवारांन पाठिंबा दिला होता. परंतु अग्निपथ योजना, लोकसंख्या कायदा तसेच जातीनिहाय जनगणनेवरून जदयूचे भाजपसोबत मतभेद झाले आहेत. अखेर आज भाजप आणि जदयूची युती तुटली असून लवकरच जदयू, राजद आणि काँग्रेसचे महागठबंधनचे सरकार स्थापन होणार आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यापालांना भेटणार

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांयकाळी ४ वाजता मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव राज्यपालांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देणार

मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपुर्द करणार आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर महागठबंधन सरकारचा नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी