Eknath Shinde : नवी दिल्ली : शिवसेना नेते एकनाथ शिंदे ३५ आमदारांसोबत गुजरातमध्ये दाखल झाले असून नॉट रिचेबल झाले आहेत. भाजपसोबत शिवसेनेने सत्तास्थापन करावी अशी अट शिंदे यांनी घातली आहे. शिवसेनेच्या या बंडखोरीवर भाजपन ऍक्शन मोडमध्ये आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससुद्धा महाराष्ट्रातून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
आज सांयकाळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी महाविकास आघाडी संकटातून नक्की बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त करत ठाकरे सरकार स्थापन होण्यापूर्वीही आमचे आमदार पळवले होते असेही शरद पवार म्हणाले आहेत.
Eknath Shinde has never conveyed to us that he wants to be CM...This is an internal issue of Shiv Sena, whatever they decide we're with them.We don't think there is any need for change in the govt: NCP's Sharad Pawar on some MLAs of Shiv Sena&Eknath Shinde currently not reachable pic.twitter.com/HVcAs56TaM — ANI (@ANI) June 21, 2022
Maharashtra | I don't know what strategy was decided but we know he(Chandrakant Handore)had received several first preference votes.Still, he received very few votes. It's a matter of concern&sends out wrong message. Congress legislative party meet called today: Prithviraj Chavan pic.twitter.com/C0JF7VKtpD — ANI (@ANI) June 21, 2022