भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, आरोपी फरार

BJP leader shot dead: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपींनी पळ काढला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

BJP leader shot dead in Ghaziabad
भाजप नेत्याची हत्या  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
  • अज्ञात आरोपींनी केली हत्या
  • आरोपींचा शोध सुरू

नवी दिल्ली: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे नेते डॉ. बीएस तोमर यांच्या अज्ञात इसमांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तोमर यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डासना जिल्ह्यात शनिवारी रात्री काही अज्ञात इसमांनी भाजप नेते तोमर यांची गोळ्या झाडून हत्या केली. आरोपी दुचाकीवरुन आले होते आणि गोळ्या झाडून त्यांनी पळ काढला. आरोपींनी तोमर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर आपली दुचाकी तेथेच टाकली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. गाझियाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास १०० क्रमांकावरुन एक कॉल आला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता हा प्रकार समोर आला. घटनास्थळी पोहोचताच आम्ही तपासही सुरू केला आहे. तोमर यांचा मृत्यू झाला असून शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याचा आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी हळूहळू जमण्यास सुरूवात केली. भाजप नेते तोमर हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. भाजप नेत्याची हत्या झाल्याने सर्वांनाच एक धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गाझियाबाद येथील दूधिया पीपल येथे ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरच दूधिया पीपल पोलीस चौकी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएस तोमर रात्री साडे नऊ वाजता आपलं क्लिनिक बंद करुन एका पानाच्या दुकानासमोर उभे होते. त्याच दरम्यान बोलेरो आणि स्कूटीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तोमर यांच्यावर गोळीबार केला. हा गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या विविध घटना घडत असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या गोळीबारात १० नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.

काय आहे सोनभद्र गोळीबार प्रकरण?

उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून वाद झाला. हा वाद इतका वाढला की वादाचं रुपांतर गोळीबारात झालं. दोन गटांत झालेल्या या वादानंतर गोळीबार झाला आणि यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास एक तासभर हा गोळीबार आणि वाद सुरू होता असं बोललं जात आहे. या गोळीबाराच्या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, आरोपी फरार Description: BJP leader shot dead: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपींनी पळ काढला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...