दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ जुलै २०१९: भाजपची महाजनादेश यात्रा ते अभिनेता भरत जाधव संतापला

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily Top News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ जुलै २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर भाजपची महाजनादेश यात्रा काढणार आहे. सध्या आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेवर आहेत. शिवसेना- भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक युतीतच लढणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मी केवळ भाजपाचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण रद्द झालेलं  चंद्रयान-2 पुन्हा उद्या प्रक्षेपणासाठी सज्ज झालं आहे. चंद्रयान २ मोहिमेचं उद्या प्रक्षेपण होईल. चौथी महत्त्वाची बातमी क्रिडा क्षेत्रातली आहे. वेस्ट इंडिजचा दौरा येत्या ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडियाची आज निवड करण्यात आली. यात बऱ्याच नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पाचवी बातमी मनोरंजन क्षेत्रातली आहे. नाट्यगृहातील असुविधेमुळे अभिनेता भरत जाधव चांगलाच संतापला आहे. भरत जाधवनं फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून आपला राग व्यक्त केला. या सविस्तर बातम्या वाचूया. 

  1. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर भाजपची महाजनादेश यात्राः लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेसह भाजपनं निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना भाजपही आता यात्रा काढणार आहे. बातमी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. विधानसभा निवडणूक युतीतच लढणार, मुख्यमंत्र्यांचं कार्यकारणीच्या बैठकीत स्पष्टीकरणः सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षामध्ये तयारी सुरू आहे. त्यात राज्यातली युती म्हणजेच भाजप आणि सेनेनं कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचक वक्तव्य केलं आहे. बातमी वाचा सविस्तर.
  3. Chandrayaan-2 आता ठरलं; उद्या चंद्रयान मोहिमेचे लाँचिंग; जाणून घ्या निश्चित वेळः Chandrayaan-2: इस्रो चंद्रयान-2 मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे इस्रोनं या मोहिमेची दुसरी अपडेटेड तारीख जाहीर केली आहे. उद्या (२२ जुलै) दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी चंद्रायान-2 मोहिमेचं प्रक्षेपण होईल. बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात 'या' खेळाडूंना संधीः Team India for West Indies Tour आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने पत्रकार परिषद घेत टीम इंडियाची घोषणा केली आहे. बातमी वाचा सविस्तर.
  5. [VIDEO] नाट्यगृहातील असुविधेमुळे अभिनेता भरत जाधव संतापलाः Bharat Jadhav नाट्यगृहातील सुविधांचा कसा अभाव आहे याची माहिती प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव याने दिली आहे. असुविधेमुळे कलाकारांना कशाप्रकारे समस्यांचा सामना करावा लागतो हे भरत जाधवने सांगितलं आहे.  बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ जुलै २०१९: भाजपची महाजनादेश यात्रा ते अभिनेता भरत जाधव संतापला Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता