BJP आमदाराच्या चालकाचा प्रताप, टोल कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात, घटनेचा LIVE VIDEO आला समोर

BJP MLA's associate slapped toll plaza employee: टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आमदाराच्या गाडी चालकाकडे आयकार्ड मागितल्याने संतप्त झालेल्या चालकाने टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

BJP MLA aide slapped a toll plaza employee in Rajasthan incident caught in cctv watch video
BJP आमदाराच्या चालकाचा प्रताप, टोल कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात, घटनेचा LIVE VIDEO आला समोर 
थोडं पण कामाचं
  • टोल कर्मचाऱ्याला मारहाण 
  • भाजप आमदाराच्या सहाय्याकाने केली मारहाण 
  • घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत कैद

जयपूर : टोल नाक्यावरील कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यात वाद झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्याच दरम्यान आता भाजप आमदाराच्या एका सहाय्यकाने टोल कर्मचाऱ्याच्या कानशिलात (BJP MLA's associate slapped toll plaza employee) लगावल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Caught in CCTV) कैद झाली आहे. राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूर (Jaipur) येथील शाहपुरा परिसरातील मनोहरपूर-दौसा महामार्गावरील टोल नाक्यावर ही घटना घडली आहे.

अलवर शहरातील भाजपचे आमदार संजय शर्मा हे नेकावाला टोल प्लाझावरुन जात असताना तेथील कर्मचाऱ्यांनी आमदारांच्या चालकाला आयकार्डची मागणी केली. यावेळी टोल कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली. त्यानंतर आमदराच्या सहाय्यकाने टोल कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली.

आमदार संजय शर्मा हे नेकावाला टोल प्लाझा मार्गे जयपूरला जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आमदारांनी केलेल्या तक्रारीनुसार, रायसर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्रात येत्या आठवड्यात मुसळधार पावसाचा इशारा

आयकार्ड मागितल्याने आमदार संतापले

मिळालेल्या माहितीनुसार, अलवर शहरातील भाजप आमदार संजय शर्मा शनिवारी संध्याकाळी मनोहरपूर दौसा राष्ट्रीय महामार्गावरील नेकावाला टोल प्लाझा मार्गे जयपूरला जात होते. त्याच दरम्यान एका टोल कर्मचाऱ्याने टोल नाक्यावर आमदारांची गाडी थांबवत ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी आमदाराच्या चालकाने टोल व्यवस्थापकाला बोलवण्यास सांगितले. यावरुन वाद सुरू झाला.

टोल नाक्यावर फास्टटॅग जवळ असलेल्या तरुणाचा आमदाराच्या गाडी चालकासोबत वाद सुरू झाला. यानंतर आमदारांनी आपलं आयकार्ड दाखवलं आणि मग गाडी टोल नाका ओलांडून पुढे नेली. त्यानंतर चालकाने पुढे गाडी थांबवली.

यानंतर आमदारांनी टोल कर्मचाऱ्याला तेथील मॅनेजरला बोलावण्यास सांगितले. काही वेळातच टोल व्यवस्थापक तेथे आले आणि त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याची चूक असल्याचं सांगत आमदारांची माफी मागितली. यानंतर आमदारांच्या चालकाने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. तसेच गाडीतून लाकडी दांडका काढून मारण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी