भाजप खासदार वरुण गांधी सोडणार कमळाची साथ अन् तृणमूल काँग्रेसच्यासोबत जाणार?

Varun Gandhi And Mamata Banerjee : पक्षनेतृत्वावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी (MP Varun Gandhi) भाजपला (BJP) रामराम ठोकणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.

 bjp mp varun gandhi likely to join tmc
वरुण गांधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दिल्ली दौऱ्यामध्ये ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची भेट होणार
  • वरुण गांधी भाजपवर नाराज आहेत.
  • केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज

Varun Gandhi And Mamata Banerjee : नवी  दिल्ली :  पक्षनेतृत्वावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी (MP Varun Gandhi) भाजपला (BJP) रामराम ठोकणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. वरुण गांधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. ममता बॅनर्जी आजपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. 

या दौऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीमध्ये वरुण गांधी टीएमसीमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून वरुण गांधी भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे भाजपवर टीकाही केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी यांनी पक्षावरील आपली जाहीर नाराजी अनेकदा व्यक्त केली. सोशल मीडियावर वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या धोरणावर टीका केली आहे. दरम्यान, खासदार वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आजपासून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. 

या दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून वरुण गांधी पक्षावर नाराज आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी