वरुण गांधी कमळला बाण मारणार; शिवसेना नेते संजय राऊतांसोबत भाजप खासदार वरुण गांधींचं डिनर

भाजप खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी (29 मार्च) रात्री ही बैठक झाली. सुमारे तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चादेखील झाली. संजय राऊत यांनी वरुण गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं.

Shiv Sena leader Sanjay Raut
शिवसेना नेते संजय राऊतांसोबत भाजप खासदार वरुण गांधींचं डिनर (संग्रहित छायाचित्र)  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार
  • भाजप नेतृत्त्वाने वरुण गांधींना 2013 मध्ये सर्वात कमी वयाचे सरचिटणीस देखील बनवलं
  • संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्या 'डिनर डिप्लोमसी'मुळे राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) आधीपासून भाजपमध्ये (BJP) राहत भाजपच्या कारभारावर बोट ठेवणारे खासदार (MP) वरुण गांधी (Varun Gandhi) यांच्या डिनरमुळे (Dinner) खळबळ माजली आहे. कारण खासदार वरुण गांधी यांनी रात्रीचे जेवण शिवसेना खासदार (Shiv Sena MP) संजय राऊतांसोबत (Sanjay Raut) केलं आहे, यामुळे भाजपमध्ये चर्चा रंगू लागली आहे. 

भाजप खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी (29 मार्च) रात्री ही बैठक झाली. सुमारे तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चादेखील झाली. संजय राऊत यांनी वरुण गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्या 'डिनर डिप्लोमसी'मुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान चर्चेचा तपशील मात्र अद्याप समजू शकलेला नाही.
25 वर्षे युतीमध्ये एकत्र राहिलेले शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रातील 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर वेगळे झाले. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका केल्याशिवाय राहत नाहीत. मात्र याच दरम्यान राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. 

भाजपवर नाराज वरुण गांधी? 

दुसरीकडे वरुण गांधी यांनी काही काळापासून स्वत:ला भाजपपासून अलिप्त ठेवल्याचं पाहायला मिळतं. भाजपवर ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचं नाव काढलं. त्यातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून वरुण गांधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपलाच घेरताना दिसत आहेत. इतकंच नाही तर पक्षातील नेत्यांवर तोंडसुख घेतानाही ते दिसतात. अशात शिवसेना नेते संजय राऊत आणि वरुण गांधी यांची भेट झाली आहे, यामुळे चर्चेला उधाण आले आहे. 

मान, सन्मान झाला कमी 

वरुण गांधी सध्या सोशल मीडियावरील आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गांधी कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य असलेल्या वरुण गांधी यांचं भाजपमध्ये जोरदार स्वागत झालं. भाजप नेतृत्त्वाने त्यांना 2013 मध्ये सर्वात कमी वयाचे सरचिटणीस देखील बनवलं. त्यांची लोकप्रियता पाहता भाजपने त्यांची पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणून नेमणूक केली. पण जसजसं राजकीय परिस्थिती बदलत गेली तसतसे वरुण गांधी यांचं पद, सन्मान आणि महत्त्व कमी होऊ लागलं. एकेकाळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे वरुण गांधी आज पक्षापासून पूर्णत: अलिप्त आहेत. अनेक वेळा त्यांनी स्वपक्षीयांवर तोंडसुख घेतलं, 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी