Operation Lotus: भाजपचं ठरलं; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात होणार ऑपरेशन लोटस

BJP's operation Lotus in NCP's ground: भारतीय जनता पक्षाने आपली पुढील रणनिती ठरवली असून आता थेट शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाणार आहे.

BJP operation lotus in NCP ground western maharashtra it will affect majorly in sharad pawar party
भाजपचं ठरलं; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात होणार ऑपरेशन लोटस 
थोडं पण कामाचं
  • भाजपचं ऑपरेशन लोटस
  • राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडणार?
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते, पदाधिकारी भाजपच्या गळाला लागणार? 

Operation Lotus in Maharashtra: महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे गटासोबत राज्यात सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन झाल्यावर आता भाजपने आपली पुढील रणनिती आखली असून आता थेट शरद पवारांच्या बालेकिल्ल्यातच ऑपरेशन लोटस राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीला आता पहिला धक्का बसताना दिसून येत आहे. (BJP operation lotus in NCP ground western Maharashtra it will affect majorly in sharad pawar party)

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबन शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे सुद्धा भाजपच्याच वाटेवर असल्याचं वृत्त आहे. आमदार बबन शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील यांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता हे दोघेही आजी-माजी आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक वाचा : Chandrakant Patil:‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भाजपची खदखद आली समोर

भाजपत होणार मेगाभरती

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला सर्वात मोठं खिंडार पडलं आहे. इतकेच नाही तर ठाकरे सरकारही गेलं. त्यानंतर आता भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं बोललं जात आहे. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुका लक्षात घेत भाजपने आपली रणनिती ठरवली आहे.

अधिक वाचा : Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी

आता भाजपत लवकरच मोठी भरती होणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपत लवकरच प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. माढा या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे खासदार होते. त्यामुळे या मतदारसंघाला पूर्वीपासूनच फार महत्त्व आहे आणि पश्चिम पहाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. मात्र, आता याच पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारण्याची योजना भाजपने आखली आहे.

आता माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. या दोघांनीही भाजपत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नक्कीच एक मोठा झटका असणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी