JP Manifesto for Meghalaya election: मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी सकाळी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जे पी नड्डा यांनी म्हटलं, मेघालयसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना मला आनंद होत आहे. मेघालय हे संस्कृती आणि परंपरेने समृद्ध राज्य आहे. भाजपच्या नेतृत्वात मेघालयला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. (BJP release manifesto for meghalaya assuring 50000 on girl childbirth free LPG cylinders and more read in marathi)
मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजपने मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये 7वा वेतन आयोग लागू करणे, मुलांच्या जन्मानंतर 50,000 रुपयांचा बॉण्ड आणि दोन एलपीजी सिलेंडर मोफत देण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे.
हे पण वाचा : तुम्ही सुद्धा पोटावर झोपता? होऊ शकतात हे नुकसान
भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात म्हटलं, मेघालयात 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. यासोबतच आम्ही शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वार्षिक अर्थ सहाय्य 2000 रुपयांपर्यंत वाढवू.
हे पण वाचा : स्वप्नदोषाच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे ट्राय करा
जे पी नड्डा यांनी सांगितले की, मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे एक योजना सुरू करण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 50 हजार रुपयांचा बॉण्ड देण्यात येईल. तसेच तिचं शिक्षण मोफत केले जाईल.
हे पण वाचा : रात्री न जेवल्याने वजन कमी होते का?
याच्या व्यतिरिक्त उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 2 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घो।णा करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांनी तरुणांच्या सशक्तिकरणासाठी विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्याचा आणि रोजगाराची संधी उपलब्ध होईल यासाठी औद्योगिक क्षेत्र स्थापित करण्याचं म्हटलं आहे.