भाजपच्या संसदीय समितीची घोषणा; दिल्लीश्वरांचा महाराष्ट्र भाजपला धक्का

BJP release list of Parliamentary board members: भारतीय जनता पक्षाने आपल्या संसदीय बोर्ड आणि निवडणूक समितीची घोषणा केली आहे.  

BJP release parliament board members list Nitin Gadkari name is not there Devendra Fadnavis include in Election Committee
भाजपच्या संसदीय समितीची घोषणा; दिल्लीश्वरांचा महाराष्ट्र भाजपला धक्का 
थोडं पण कामाचं
  • भाजपच्या संसदीय बोर्ड आणि निवडणूक समितीची घोषणा
  • देवेंद्र फडणवीस भाजपच्या निवडणूक समितीचे सदस्य
  • भाजपच्या संसदीय समितीवर महाराष्ट्रातील नेत्याला स्थान नाही 

BJP Parliamentary Board and Central Election Committee list: भारतीय जनता पक्षाने आपल्या संसदीय बोर्ड आणि निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संसदीय समितीत एकूण ११ नेत्यांची नावे आहेत. मात्र, यामध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्याचा समावेश नाहीये. यापूर्वी नितीन गडकरी या समितीवर होते. मात्र, आता जाहीर करण्यात आलेल्या संसदीय समितीच्या यादीत गडकरींच्या नावाचा समावेश नाहीये. (BJP release parliament board members list Nitin Gadkari name is not there Devendra Fadnavis include in Election Committee)

भारतीय जनता पक्षासाठी संसदीय बोर्ड हे सर्वोच्च समिती मानली जाते. कारण, याच समितीच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात. या समितीत भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा या समितीत समावेश नाहीये. यासोबतच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचाही या यादीत समावेश नाहीये. या दोन्ही नेत्यांच्या ऐवजी आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदयुरप्पा आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल या नेत्यांचा संसदीय समितीत समावेश करण्यात आला आहे.

संसदीय समितीचे अध्यक्ष जे. पे. नड्डा हे असणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण ११ जणांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या संसदीय समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश होईल असं बोललं जात होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा संसदीय समितीत समावेश करण्यात आलेला नाहीये.

अधिक वाचा : Maharashtra: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

संसदीय समितीत या नेत्यांचा समावेश

  1. जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष) 
  2. नरेंद्र मोदी 
  3. राजनाथ सिंह
  4. अमित शहा
  5. बी. एस. येदयुरप्पा
  6. सर्वानंद सोनोवाल 
  7. के. लक्ष्मण 
  8. इक्बाल सिंह लालपुरा
  9. सुधा यादव
  10. सत्यनारायण जटिया
  11. बी. एल. संतोष (सचिव) 

अधिक वाचा : आमदार बांगर आणि सुर्वेंवरून पत्रकारांनी धरले धारेवर, फडणवीस म्हणाले ही तर आमचीच मुस्कटदाबी 

देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक समितीत स्थान

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश निवडणूक समितीमध्ये करण्यात आला आहे. या निवडणूक समितीत सुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत असतात. केंद्रीय निवडणूक समितीत तिकीट वाटपाचे निर्णय घेण्यात येत असतात. आता या समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे.

निवडणूक समितीत या नेत्यांचा समावेश

  1. जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष) 
  2. नरेंद्र मोदी 
  3. राजनाथ सिंह
  4. अमित शहा
  5. बी. एस. येदयुरप्पा
  6. सर्वानंद सोनोवाल 
  7. के. लक्ष्मण 
  8. इक्बाल सिंह लालपुरा
  9. सुधा यादव
  10. सत्यनारायण जटिया
  11. भूपेंद्र यादव 
  12. देवेंद्र फडणवीस
  13. ओम माथूर
  14. बी. एल. संतोष (सचिव) 
  15. वनथी श्रीनिवास

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी