BJP candidates for Goa : गोव्यातील ४० पैकी ३४ जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

BJP releases list of 34 candidates for Goa assembly elections 2022 : गोवा विधानसभेच्या ४० पैकी ३४ जागांसाठीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर झाले. पक्षाने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या ३४ उमेदवारांच्या यादीत नऊ अल्पसंख्यांक उमेदवार आहेत.

BJP releases list of 34 candidates for Goa assembly elections 2022
गोव्यातील ४० पैकी ३४ जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर 
थोडं पण कामाचं
  • गोव्यातील ४० पैकी ३४ जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
  • भाजपच्या ३४ उमेदवारांच्या यादीत नऊ अल्पसंख्यांक उमेदवार
  • गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांखळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

BJP releases list of 34 candidates for Goa assembly elections 2022 : नवी दिल्ली : गोवा विधानसभेच्या ४० पैकी ३४ जागांसाठीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर झाले. पक्षाने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपच्या ३४ उमेदवारांच्या यादीत नऊ अल्पसंख्यांक उमेदवार आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांखळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पणजी मतदारसंघातून बाबुश मोनसेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आधी पणजीतून निवडणूक लढविण्यासाठी मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल उत्सुक असल्याची चर्चा होती. पण उत्पल पर्रिकर यांचे नाव उमेदवारांच्या यादीत नाही. 

उत्पल पणजीमधूनच निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. पण ही जागा बाबुश मोनसेरात यांना दिली जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर उत्पल काय करणार याविषयी तर्कवितर्क सुरू झाले. भाजपने उत्पल यांना उर्वरित जागांपैकी अन्यत्र कुठेही  उमेदवारी दिली जाणार की नाही हे सांगितलेले नाही तसेच उत्पल यांनीही पुढे काय करणार याबाबतची माहिती दिलेली नाही.

भाजपने फिलिप नेरी रॉड्रिग्स आणि दीपक प्रभू पौसकर या दोन मंत्र्यांना उमेदवारी दिलेली नाही. सेक्स स्कँडल प्रकरणी राजीनामा देणारे मंत्री मिलिंद नाईक यांना मुरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

उपमुख्यमंत्री आणि पेरणीमचे आमदार मनोहर 'बाबू' आजगावकर यांना मडगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपने विद्यमान आमदार इसिडोर फर्नांडिस यांना डावलून माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी