मेट्रोमॅन ई श्रीधरन यांची गाडी राजकीय ट्रॅकवरुन घसरली

केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उभे राहिलेले मेट्रोमॅन ई श्रीधरन यांची गाडी राजकीय ट्रॅकवरुन घसरली. पलक्कड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ई श्रीधरन यांचा पराभव झाला.

BJP’s E Sreedharan loses Shafi Parambil retains Palakkad
मेट्रोमॅन ई श्रीधरन यांची गाडी राजकीय ट्रॅकवरुन घसरली 

थोडं पण कामाचं

  • मेट्रोमॅन ई श्रीधरन यांची गाडी राजकीय ट्रॅकवरुन घसरली
  • ई श्रीधरन यांचा पराभव
  • पलक्कड विधानसभा मतदारसंघ - काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परमबिल पुन्हा विजयी

नवी दिल्ली: केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उभे राहिलेले मेट्रोमॅन ई श्रीधरन यांची गाडी राजकीय ट्रॅकवरुन घसरली. पलक्कड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ई श्रीधरन यांचा पराभव झाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परमबिल पुन्हा विजयी झाले. ते ७ हजार ४०३ मतांनी जिंकले. BJP’s E Sreedharan loses Shafi Parambil retains Palakkad

केरळमध्ये भाजपचा विशेष प्रभाव नाही. पण ई श्रीधरन यांची मेट्रोमॅन अशी प्रतिमा आहे. त्यांनी १९७० मध्ये कोलकाता मेट्रो नंतर कोचिन शिपयार्ड, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोच्ची मेट्रो, लखनऊ मेट्रो या प्रकल्पांचे नेतृत्व केले होते. देशभर एक अभियंता आणि उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. या लोकप्रियतेचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपने केरळमध्ये ई श्रीधरन यांना उमेदवारी दिली.

मूळचे केरळचे असलेल्या ई श्रीधरन यांनी ८८व्या वर्षी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सक्तीचे धर्मांतर, फसवणूक करुन होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद हे विषय घेऊन ई श्रीधरन यांनी प्रचार केला. हे मुद्दे ज्यांना पटले त्यांनी ई श्रीधरन यांना पाठिंबा दिला तर ज्यांना पटले नाही अशांनी त्यांचा विरोध केला. निवडणुकीत ई श्रीधरन यांचा ७ हजार ४०३ मतांनी पराभव झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी