Electoral Bonds : भारतात 2021-22 मध्ये कोणत्या पक्षाला देणगीरुपाने मिळाले किती पैसे, BJP, Congress, TMC ला मिळाले किती पैसे?

BJP tops receipts with Rs 1917 crore and TMC second with Rs 546 crore : भारतात 2021-22 मध्ये कोणत्या पक्षाला देणगीरुपाने मिळाले किती पैसे मिळाले याची आकडेवारी समोर आली आहे.

BJP tops receipts with Rs 1917 crore
भारतात 2021-22 मध्ये कोणत्या पक्षाला देणगीरुपाने मिळाले किती पैसे?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात 2021-22 मध्ये कोणत्या पक्षाला देणगीरुपाने मिळाले किती पैसे?
  • BJP, Congress, TMC ला मिळाले किती पैसे?
  • निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर रिपोर्ट

BJP tops receipts with Rs 1917 crore and TMC second with Rs 546 crore : भारतात 2021-22 मध्ये कोणत्या पक्षाला देणगीरुपाने मिळाले किती पैसे मिळाले याची आकडेवारी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीला अर्थात भाजपाला 2021-22 मध्ये 1917 कोटी रुपये मिळाले. भाजपाला 2020-21 मध्ये मिळालेल्या पैशांपेक्षा 2021-22 मध्ये 154 टक्के जास्त पैसे मिळाले. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजपाला 2020-21 मध्ये 752 कोटी रुपये मिळाले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला 2021-22 मध्ये 545.7 कोटी रुपये मिळाले. भारतात 2021-22 मध्ये देणगीरुपाने अर्थात इलेक्टोरल बाँडच्या स्वरुपात सर्वाधिक पैसे भाजपाला मिळाले. या यादीत दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस आहे. यादीत तिसऱ्या स्थानी काँग्रेस आहे. काँग्रेसला 2021-22 मध्ये 541.2 कोटी रुपये मिळाले. याआधी 2020-21 मध्ये काँग्रेसला 285.7 कोटी रुपये मिळाले होते. काँग्रेसला 2020-21 च्या तुलनेत 2021-22 मध्ये 89 टक्के जास्त पैसे मिळाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अर्थात सीपीएमला 2021-22 मध्ये देणगी रुपाने 162.2 कोटी मिळाले. याआधी 2020-21 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अर्थात सीपीएमला देणगी रुपाने 171 कोटी रुपये मिळाले होते.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर रिपोर्ट

भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 8 राष्ट्रीय पक्षांचे ऑडिट रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या रिपोर्टमधून कोणत्या पक्षाला 2020-21 मध्ये किती पैसे देणगीरुपाने मिळाले हे स्पष्ट होत आहे. भारतात इलेक्टोरल बाँड खरेदी करून व्यक्ती अथवा संस्था राजकीय पक्षांना मोठ्या देणग्या देऊ शकतात. रिपोर्टनुसार, देशातील प्रमुख 8 राष्ट्रीय पक्षांना मिळून 2021-22 मध्ये एकूण 3289 कोटी रुपये मिळाले. यात भाजपाचा वाटा 58 टक्के आहे. 

पैसे मिळवण्याच्या बाबतीत भाजपापेक्षा तृणमूल काँग्रेस हा पक्ष जास्त यशस्वी ठरला आहे. त्यांना 2020-21च्या तुलनेत 2021-22 मध्ये 633 टक्के जास्त पैसे मिळाले आहेत. तृणमूल काँग्रेसला 2020-21 मध्ये 74.4 कोटी रुपये मिळाले आणि 2021-22 मध्ये 545.7 कोटी रुपये मिळाले.

इलेक्टोरल बाँड

भारतात इलेक्टोरल बाँड खरेदी करून व्यक्ती अथवा संस्था राजकीय पक्षांना मोठ्या देणग्या देऊ शकतात. रिपोर्टनुसार, 2021-22 मध्ये भाजपाला मिळालेल्या एकूण देणगीपैकी 54 टक्के देणगी ही इलेक्टोरल बाँड खरेदी करून व्यक्ती अथवा संस्था यांनी दिली. तृणमूल काँग्रेसला 96 टक्के पैसे (528 कोटी रुपये) इलेक्टोरल बाँड खरेदी करून देण्यात आले. काँग्रेसला 2020-21 मध्ये इलेक्टोरल बाँड खरेदी करून 10 कोटी रुपयांनी देणगी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2021-22 मध्ये इलेक्टोरल बाँड खरेदी करून 14 कोटी रुपये देणगी देण्यात आली.

कोणत्या पक्षाने किती केला खर्च केला?

प्रमुख राजकीय पक्षांनी 2021-22 मध्ये किती खर्च केला याचे आकडे पण जाहीर झाले आहेत. भाजपाने 2021-22 मध्ये 854.46 कोटी रुपयांचा खर्च केला. काँग्रेसने 2021-22 मध्ये 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. तृणमूल काँग्रेसने 2021-22 मध्ये 268.3 कोटी रुपयांचा खर्च केला. बहुजन समाज पार्टीने 2021-22 मध्ये 85.1 कोटी रुपयांचा खर्च केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने 2021-22 मध्ये 83.41 कोटी रुपयांचा खर्च केला. भारतीय कम्युनिस्ट पार्टीने 2021-22 मध्ये 1.2 कोटी रुपयांचा खर्च केला. राष्ट्रवादी काँग्रेसने 2021-22 मध्ये 32.2 कोटी रुपयांचा खर्च केला तर नॅशनल पीपल्स पार्टीने 2021-22 मध्ये 39 लाख रुपयांचा खर्च केला.

Unhealthy food for kids: सावधान! मुलांना चुकूनही देऊ नका हे पदार्थ, पडेल महागात

पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी