UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजप कापणार विद्यमान आमदारांचे तिकीट, ४५ आमदारांवर टांगती तलवार, आयाराम गयारामांना येणार उधाण

UP Election 2022 उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ४५ आमदारांवर तिकीट कापण्याची टांगती तलवार आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
  • उत्तर प्रदेशमध्ये भाजप विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार आहे.
  • ४५ आमदारांवर तिकीट कापण्याची टांगती तलवार

UP Election 2022 : लखनौ : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ४५ आमदारांवर तिकीट कापण्याची टांगती तलवार आहे. भाजपमध्ये तिकीट वाटपावरून मंथन सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे सर्व आमदारांची कुंडली आली असून त्यांनी गेल्या पाच वर्षात काय काम केली आहेत याचा लेखा जोखा तयार आहे. कुठल्या आमदाराला तिकीट द्यायचे आणि कुणाला डच्चू द्यायचा यावर पक्षात चर्चा सुरू आहे. (bjp uttar pradesh may 45 mla may not get election ticket )

घाबरलेल्या आमदारांचा राजीनामा

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या अनेक आमदारांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. ज्यांना तिकीट कापले जाण्याची भिती आहे, तेच आमदार राजीनामा देत आहेत अशी प्रतिक्रिया भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. या आमदारांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले आहे, त्यावरच त्यांना तिकीट दिले जाईल, काही आमदारांना तिकीट न मिळण्याची खात्री आहे म्हणूनच ते राजीनामा देत आहेत अशे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. लोक योगीच्या कामावर खूश आहेत, परंतु काही आमदारांच्या विरोधात जनतेच्या मनात रोष आहे असेही भाजपच्या नेत्यांनी नमूद केले आहे. तर दुसरीकडे भाजपचे अनेक नेते आणि आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक लवकरच पार पाडणार आहे, त्यामुळे भाजप कुठलाही धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न कर आहेत. 

१३ आमदार भाजपची साथ सोडणार

उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी आणि सपा एकत्र निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. तसेच भाजपचे १३ आमदार पक्षाची साथ सोडणार असून ते लवकरच समाजवादी पक्षात सामील होणार आहेत असा दावा पवार यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी