भाजप उपाध्यक्षांनी फार्महाऊसवरच थाटला वेश्या व्यवसाय; ५०० कंडोम सापडले, ७३ जण अटकेत

मेघालयमधील (Meghalaya) तुरा (Tura) येथील सेक्स रॅकेटचा (sex rocket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही सेक्स रॅकेट भाजपच्या नेत्याच्या फॉर्महाऊसवर (Farmhouse) सुरू असल्यानं भाजपला (BJP) टीकेला सामोरे जावे लागणार आहे. याप्रकरणी मेघालय राज्य भाजपचे (State BJP) उपाध्यक्ष बेर्नार्ड एन. मरक (Vice President Bernard N. Mark) यांच्यावर वेश्या व्यवसाय (Prostitute business) चालवत असल्याचा आरोप झाला आहे.

BJP Vice President's Farmhouse Raid; Sex racket busted
भाजप उपाध्यक्षाच्या फार्महाऊसवरच व्हायचा वेश्या व्यवसाय   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मरक यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर गोपनीय माहितीच्या आधारे छापा
  • रिंपू बागान नावाच्या फार्म हाऊसवर अल्पयवीन मुलांना कोंडून ठेवण्यात आलं होतं.
  • छापेमारीदरम्यान दारुच्या ४०० बाटल्या आणि ५०० हून अधिक कंडोम सापडले.

शिलाँग: मेघालयमधील (Meghalaya) तुरा (Tura) येथील सेक्स रॅकेटचा (sex rocket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही सेक्स रॅकेट भाजपच्या नेत्याच्या फॉर्महाऊसवर (Farmhouse) सुरू असल्यानं भाजपला (BJP) टीकेला सामोरे जावे लागणार आहे. याप्रकरणी मेघालय राज्य भाजपचे (State BJP) उपाध्यक्ष बेर्नार्ड एन. मरक (Vice President Bernard N. Mark) यांच्यावर वेश्या व्यवसाय (Prostitute business) चालवत असल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांकडून कारवाईच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी छापेमारी करून सहा अल्पवयीन मुलांची सुटका केली. कारवाईदरम्यान पोलिसांना दारूच्या जवळपास ४०० बाटल्या आणि ५०० हून अधिक कंडोम सापडले. परंतु वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप मरक यांनी फेटाळला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्यावरच निशाणा साधला आहे.

माध्यामांना मिळालेल्या माहितीनुसार, मरक यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी सहा अल्पवयीन बालकं (चार मुलं आणि दोन मुली) आढळून आली, अशी माहिती पश्चिम गारो हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेकानंद सिंह यांनी माध्यमांना दिली. रिंपू बागान नावाच्या फार्म हाऊसवर अल्पयवीन मुलांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. बर्नार्ड मरक आणि त्यांचे सहकारी या ठिकाणाहून सेक्स रॅकेट चालवत असायचे.

Read Also : अक्षर पटेलची कमाल कामगिरी, भारताचा विक्रम

फार्महाऊसवरून सुटका करण्यात आलेल्या बालकांचा ताबा जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी घेतला आहे. पोलिसांना छापेमारीदरम्यान दारुच्या ४०० बाटल्या आणि ५०० हून अधिक कंडोम सापडले. या ठिकाणाहून ७३ जणांना अटक करण्यात आली आहे. अवैध कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यात आली आहे. फार्महाऊसवर ३० लहान खोल्या आहेत. याप्रकरणात मरक यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मेघालयमध्ये एनडीएचं सरकार आहे. संगमा यांचा नॅशनल पीपल्स पक्ष सत्तेतला सर्वात मोठा घटकपक्ष आहे.

Read Also : या 4 गोष्टींनंतर अंघोळ करायला विसरू नका, नाहीतर...

दरम्यान, भाजप उपाध्यक्ष मरक यांच्यावर याआधीही लैंगिक अत्याचाराच आरोप झाला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते. त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तो गुन्हा मरक यांच्याच फार्महाऊसवर घडला असावा असा संशय पोलिसांना आहे. 

Read Also : भारताच्या हद्दीत घुसली चीनची लढाऊ विमाने

मरक यांच्या सेक्स रॉकेट चालवण्याचा आरोप होत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री हताश झाले आहेत. भाजपच्या दक्षिण तुरा मतदारसंघात त्यांचा पराभव होणार याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच माझ्या फार्महाऊसवर छापा टाकून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकीय सूडभावनेपोटी हा छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप मरक यांनी केला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी