BJP National Executive Meet: पुढील 30 ते 40 वर्षं देशभर भाजपचाच गवगवा, गृहमंत्री अमित शाहांचा दावा, भारत होणार विश्वगुरू

काँग्रेस पक्ष सध्या अंतर्गत लोकशाही टिकवण्यासाठी झगडत असून भाजप पुढील तीस ते चाळीस वर्ष देशावर राज्य करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे

BJP National Executive Meet
पुढील 30-40 वर्षे भाजपाचाच गवगवा - अमित शाह  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • देशात पुढील 30 ते 40 वर्षे भाजपचेच राज्य
  • अमित शाह यांची टीका
  • काँग्रेसवर जोरदार टीका

BJP National Executive Meet | देशात पुढील तीस ते चाळीस वर्ष भाजपचीच सत्ता राहिल असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी माध्यमांना दिली आहे. तेलंगणान आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यात अद्याप भाजपला यश आलेलं नाही. मात्र लवकरच या राज्यांतही भाजपची सत्ता येईल, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. 

जातीयवाद आणि घराणेशाहीवर टीका

जातीयवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण या भारतीय राजकारणातील मुख्य विकृती असल्याची टीका अमित शाह यांनी केली. या तिन्ही गोष्टी भारतीय राजकारणातून मुळासह उपटून टाकण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना या बैठकीत केलं. भारतीय राजकारणातील या विकृतींमुळेच आजवर देशाच्या प्रगतीत अडथळे येत राहिले, असं मत व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या विरोधात अधिक आक्रमकपणे लढा देण्याचं आवाहन केलं.

काँग्रेसवर टीका

देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला पक्षांतर्गत लोकशाही प्रस्थापित करण्यातच अपयश येत आहे. पक्षात लोकशाही आणण्यासाठी त्याच पक्षाचे नेते सध्या संघर्ष करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. गांधी घराण्याला आपली पक्षातील सत्ता जाण्याची भिती वाटत आहे, अशी टीका त्यांनी केली. यामुळे काँग्रेस पक्ष सध्या हतबल आणि हताश अवस्थेत आहे. त्यामुळे सरकारच्या कुठल्याही चांगल्या निर्णयावर विनाकारण टीका करण्याचं काम काँग्रेसकडून होत असल्याचा दावा शाह यांनी केला आहे. सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकसारख्या निर्णयांवर त्यामुळेच काँग्रेसकडून टीका होते. काश्मीरमधून 370 कलम हटवल्याच्या मुद्‌द्यावरही त्याच कारणामुळे काँग्रेसकडून टीका होत असल्याचा दावा त्यांनी केला. 

अधिक  वाचा - जम्मूमध्ये पकडलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी निघाला भाजपा IT सेलचा प्रमुख

पंतप्रधानांनी सहन केला अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दंगलींप्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना क्लीनचिट दिली असली तरी त्यापूर्वी 19 वर्षे त्यांनी हा अपमान सहन केला, असा दावा शाह यांनी केला. सततच्या चौकशा, एसआयटीचे प्रश्न यासह अनेक बाबी त्यांनी सहन केल्या आणि लोकशाहीवर प्रगाढ विश्वास ठेवत आपली निष्ठा दाखवून दिली, असं ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल नेते ईडीच्या चौकशीला सामोरे जाताना एवढा गवगवा करत आहेत, मात्र पंतप्रधान मोदींनी 19 वर्षं कुठलाही गवगवा न करता अपमान सहन केला, असा दावा त्यांनी केला आहे. 

अधिक  वाचा - Taj Mahal : ताजमहालच्या तळघरात हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत का? RTI मधून पुरातत्व विभागानं दिली धक्कादायक माहिती

उदयपूर हत्येवरून काँग्रेसवर टीका

उदयपूर हत्या प्रकरणावरून अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केल्याची माहिती या बैठकील उपस्थित असलेल्या काही सदस्यांनी दिली आहे. काँग्रेसनं देशात तुष्टीकरणाची संस्कृती रुजवली नसती, तर आज कदाचित उदयपूर हत्याकांड घडलंच नसतं, असा आरोप अमित शाह यांनी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी