UP Opinion Poll नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्व पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे बहुतांश राजकीय पक्षांनी व्हर्चुअल राजकीय प्रचारावर जोर दिला आहे. निवडणुकीपूर्वी काही ओपिनियन पोलमध्ये भाजप जिंकणार असे भविष्य वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्ष भाजपला चांगलीच टक्कर देण्यार आहे. इंडिया टीव्हीच्या ओपिनिय पोलमध्ये भाजपला २३० ते २३५ जागा मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
मतदानपूर्व सर्वेक्षणात समाजवादी पक्ष भाजपला चांगलीच टक्कर देत आहे. ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला २३० ते २३५ जागा मिळण्याच्या शक्यता इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. तर समाजवादी पक्षाला १६० ते १६५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर काँग्रेसला ३ ते ७, बसपाला २ ते ५ जागा मिळतील असे अंदाज इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
ओपिनियन पोलनुसार पूर्वांचलमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षात चांगलीच टक्कर असणार आहे असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये व्यक्त केला आहे. पूर्वांचलमध्ये भाजपला फटका बसणार असून १२४ जागांपैकी ६६ जागा मिळतील तर सपाला ५१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. २०१७ साली पूर्वांचलमध्ये भाजपला ९४ जागा मिळाल्या होत्या तर सपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०१७ साली बसपाला १० तर काँग्रेसला अवघ्या २ जागा मिळाल्या होत्या.
ओपिनियन पोलनुसार गोरखपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दणदणीत विजय होणार आहे. गोरखपूर हा विधानसभा मतदारसंघ पूर्वांचल विभागात आहे आणि हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मुख्यमंत्री योगी स्वतः गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून १९९८ पासून सलग पाच वेळा खासदार झाले आहेत. २०१७ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघातून राजीनामा दिला आणि विधानपरिषदेतून आमदार झाले.