Byelection BJP Victory :विधानसभा पोटनिवडणुकीत चार ठिकाणी भाजपचा विजय, तेलंगणात पराजय

Byelection BJP Victory : सोमवारी अंधेरी  पूर्व विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत आधी भाजपने मूरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु नंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. लटके यांना ६६ हजार ५३० मते मिळाली. अंधेरीसह देशातील सहा राज्यातील ७ विधानभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी सहा ठिकाणी भाजपने आपले उमेदवार दिले होते.

bjp won four byelection
पोटनिवडणुकीत भाजपला चार ठिकाणी यश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंधेरीसह देशातील सहा राज्यातील ७ विधानभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती.
  • त्यापैकी सहा ठिकाणी भाजपने आपले उमेदवार दिले होते.
  • पोटनिवडणुकीत भाजपला चार ठिकाणी यश मिळाले असून दोन ठिकाणी पराभव झाला आहे.

Byelection BJP Victory : नवी दिल्ली : सोमवारी अंधेरी  पूर्व विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत आधी भाजपने मूरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु नंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. लटके यांना ६६ हजार ५३० मते मिळाली. अंधेरीसह देशातील सहा राज्यातील ७ विधानभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी सहा ठिकाणी भाजपने आपले उमेदवार दिले होते. सहा पैकी ४ ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे. बिहारमध्ये राजद तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीच्या उमेदवराचा विजय झाला आहे. तेलंगणात जरी भाजपचा पराजय झाला असला तरी भाजपच्या उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली आहेत. तसेच बिहारच्या मोकामा मतदारसंघात भाजपचा पराजय झाला असून राजदचा उमेदवार विजयी झाला आहे. (bjp won four assembly byelection  two lost in bihar and telangana state)

अधिक वाचा : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन; आतापर्यंत 34 वेळा केलंय मतदान

भाजपचा चार ठिकाणी विजय

भाजपला उत्तर प्रदेशच्या गोला गोकर्णनाथ, हरयाणाच्या आदमपूर आणि बिहारच्या गोपालगंज विधानसभा पोटनिवडणुकीत यश मिळाले आहे. बिहारच्या मोकामा विधानसभा पोटनिवडणुकीत राजदला यश मिळाले आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आणि  राजदसोबत युती केली. भाजपसोबत युती केल्यानंतर ही पहिलीच निवडणुक होती. या निवडणुकीत राजद आणि भाजपला यश मिळाले आहे. परंतु जदयूचा पराभव झाल आहे. मोकामा विधानसभेचे आमदार अनंत सिंह यांची आमदारकी रद्द झाली होती. सिंह यांनी बेकायदेशीरपणे बंदूक बाळगल्याप्रकरणी त्यांची आमदारकी रद्द झाली. या पोटनिवडणुकीत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी उभ्या होत्या. नीलम देवी यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करून राजदचा विजय झाला. हरयाणात माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे पुत्र कुलदीप बिश्नोई हे काँग्रेसचे आमदार होते, त्यांनी पक्षातून राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश घेतला. बिश्नोई यांनी आदमपूर मतदारसंघ राखण्यात यश आले आहे. तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीचे उमेदवार प्रभारक रेड्डी यांनी भाजपचे उमेदवार राजगोपाल रेड्डी यांचा १० हजार ३०९ मतांनी पराभव केला आहे. 

अधिक वाचा : Biden on Elon Musk : इलॉन मस्कवर संतापले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन...ट्विटरच्या खोटारडेपणावर ठेवले बोट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी