भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी 'हा' नेता

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 17, 2019 | 21:06 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

BJP working president: भारतीय जनता पक्षाने जे. पी. नड्डा यांची पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सोमवारी झालेल्या पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

bjp working president j p nadda
जे. पी. नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने जे. पी. नड्डा यांची पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शहा यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून त्यांना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

जे. पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. भाजपचे वरिष्ठ नेता आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, अमित शहा यांनी भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी अगदी योग्य प्रकारे सांभाळली आहे. अमित शहा यांच्या नेत्रृत्वात भाजपने अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री पद सोपवलं त्यानंतर अमित शहा यांनी स्वत:हून भाजपचं अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीला देण्याची मागणी केली.भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. सूत्रांच्या मते अमित शहा हे डिसेंबर पर्यंत भाजप अध्यक्ष पदावर राहतील.

कोण आहेत जे. पी. नड्डा 

भाजपचे जेष्ठ आणि वरिष्ठ नेता जगत प्रकाश नड्डा हे राज्यसभेचे सदस्य आहेत. पाटणा येथे १९६० साली जन्म झालेल्या जगत प्रकाश नड्डा यांनी आपलं बीएचं शिक्षण पाटणात पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी एलएलबीची पदवी घेतली. सुरूवतीच्या काळात नड्डा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय झाले. त्यानंतर १९९३ साली हिमाचल प्रदेशमधून ते पहिल्यांदा आमदार झाले. जे. पी. नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातही सहभागी होते. त्यांच्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी 'हा' नेता Description: BJP working president: भारतीय जनता पक्षाने जे. पी. नड्डा यांची पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. सोमवारी झालेल्या पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles