Assembly Elections विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा मास्टर प्लॅन

मणिपूर, गोवा, पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार आहे. या प्लॅननुसार भाजपने पाच राज्यांमध्ये प्रचारासाठी १०० खासदारांकडे जबाबदारी सोपवली आहे.

BJP's Special plan for assembly elections, These MPs will not be seen in Parliament from Monday
Assembly Elections विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा मास्टर प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • Assembly Elections विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा मास्टर प्लॅन
  • भाजपने पाच राज्यांमध्ये प्रचारासाठी १०० खासदारांकडे जबाबदारी सोपवली
  • खासदार सोमवार १३ डिसेंबरपासून प्रचाराच्या कामाला सुरुवात करतील

नवी दिल्ली: मणिपूर, गोवा, पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार आहे. या प्लॅननुसार भाजपने पाच राज्यांमध्ये प्रचारासाठी १०० खासदारांकडे जबाबदारी सोपवली आहे. हे खासदार सोमवार १३ डिसेंबरपासून प्रचाराच्या कामाला सुरुवात करतील. यामुळे हे खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंतच्या दिवसांत संसदेत नसतील किंवा येऊन-जाऊन असतील. 

जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार संसदेचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. अधिवेशनाचे आता जेमतेम दोन आठवडे उरले आहेत. यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रचारासाठी भाजपने निवडलेल्या १०० खासदारांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील खासदारांचा समावेश आहे. निवडलेल्या खासदारांमध्ये मंत्र्यांचाही समावेश आहे. प्रचार कसा करायचा, कोणत्या मुद्यांना महत्त्व द्यायचे याचेही नियोजन भाजपने केले आहे.

कोणत्या खासदारांना कोणत्या राज्याची जबाबदारी?

  • मणिपूर - विधानसभेच्या ६० जागांसाठी प्रचार. प्रामुख्याने ईशान्यकडील खासदारांकडे प्रचाराची जबाबदारी. भाजपला २०१७च्या निवडणुकीत या राज्यात १७ जागांवर विजय ळाला होता. काँग्रेसला २८, NPF ला ४, NPP ला ४, TMC ला १, LJP ला १ जागा मिळाली होती. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. 
  • गोवा - विधानसभेच्या ४० जागांसाठी प्रचार. गोवा आणि महाराष्ट्रातील खासदारांकडे प्रचाराची जबाबदारी. भाजपला २०१७च्या निवडणुकीत या राज्यात १३ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसला १७, राष्ट्रवादी काँग्रेसला १, अपक्षांना ३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ आणि फॉरवर्ड पार्टीला ३ जागांवर विजय मिळाला होता. पण इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन भाजपने सत्ता मिळवली.
  • पंजाब - विधानसभेच्या ११७ जागांसाठी प्रचार. पंजाब, दिल्ली, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशच्या खासदारांकडे प्रचाराची जबाबदारी. भाजपला २०१७च्या निवडणुकीत या राज्यात शिरोमणी अकाली दलसोबत युती करुन १८ जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेसने ७७ आणि AAP ने २२ जागा जिंकल्या होत्या. 
  • उत्तरप्रदेश-उत्तराखंड - उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये अनेक खासदार आणि मंत्री भाजपचा प्रचार करतील. बिहारच्या भाजप खासदारांकडे पूर्वांचलच्या १६ जिल्ह्यांची जबाबदारी आहे. निवडणूक संपेपर्यंत या खासदारांचा मुक्काम पूर्वांचलमध्येच असेल. उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागांसाठी आणि उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागांसाठी प्रचार होणार आहे. भाजपला उत्तरप्रदेशमध्ये २०१७ च्या निवडणुकीत ३१२ जागांवर विजय मिळाला होता. तसेच भाजपला उत्तराखंडमध्ये २०१७ च्या निवडणुकीत ५६ जागांवर विजय मिळाला होता. भाजपने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला ११ आणि अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी