Jammu Kashmir : श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जम्मू कश्मीर दौर्यापूर्वी जम्मूमध्ये एक स्फोट झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमास्थळाहून १२ किमी दूर ललियाना गावात एका शेतात स्फोट झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंचायती राज दिनानिमित्त एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी राज्याच्या भेटीला असणार आहे, त्यामुळे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (blast in jammu kashmir before pm narendra modi visit police denied angle of terrorism)
हा स्फोट म्हणजे कुठलाही दहशतवादी हल्ला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जम्मूच्या बिश्नाह भागात ललियान गावाती एका शेतात स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा स्फोट वीज कोसळल्याने किंवा उल्कापात झाल्याने असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच या स्फोटाचा आणि दशतवादाचा काही संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Jammu | "Suspected blast" reported by villagers in open agricultural land in Lalian village, Bishnah
— ANI (@ANI) April 24, 2022
Suspecting it to be a lightning strike or a meteorite; Investigation is underway, say police. pic.twitter.com/6PFaD8hHN0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यापूर्वी जम्मू कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांची आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत पाकिस्तानचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कश्मीरच्या कुलगाम भागातील मिरहाम येथे काही अतिरेकी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम राबवली. तेव्हा लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला आणि चकमक उडाली. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ही चकमक अजूनही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरपीएफ सैनिकाच्या खुनाप्रकरणी लश्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीन्सुआर पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात दोन दहशतवाद्यांनी आरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. त्यापैकी एका दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले आहे. हा दहशतवादी लश्कर-ए-तैयबा संघटनेचा असून दुसर्या दहशतवाद्याचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.