Afghanistan School Explosion :अफगाणिस्तानमध्ये शाळेत तीन स्फोट, ५ते ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Afghanistan School Explosion अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका शाळेत तीन स्फोट झाले आहेत. या स्फोटात आतापर्यंत ५-६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. काबुलच्या शिएत हझारा भागात हा स्फोट झाला असून  या भागात अल्पसंख्यांक हझारा समुदायाचे लोक राहतात.

kabul blast
Afghanistan School Explosion :अफगाणिस्तानमध्ये शाळेजवळ भीषण स्फोट, अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका शाळेत तीन स्फोट झाले आहेत.
  • या स्फोटात आतापर्यंत ५-६ जणांचा मृत्यू
  • ६ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Afghanistan Blast : काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका शाळेत तीन स्फोट झाले आहेत. या स्फोटात आतापर्यंत ५-६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६ हून अधिक जण जखमी झाले आहेत.  काबुलच्या शिएत हझारा भागात हा स्फोट झाला असून  या भागात अल्पसंख्यांक हझारा समुदायाचे लोक राहतात. शिया कट्टर पंथियांनी गेल्या काही दिवसांत या समाजाला सातत्याने लक्ष्य केले आहे. 


काबुलच्या पश्चिम भागात स्फोट झाला असून त्यात सहा जणांचा मृत्यू पावल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटात सहाहून अधिक जखमी झाले आहेत. काबुलच्या मुमताझ शाळे पहिला स्फोट झाला होता. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी म्हटले आहे. तसेच शाळेजवर दुसरा स्फोट झाला  होता. या स्फोटात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. 

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका शाळे जवळ तीन मोठे स्फोट झाले आहेत. या स्फोटात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा शाळकरी विद्यार्थी आपल्या शाळेत जात होते तेव्हा हे स्फोट झाला. या प्रकरणी बचाव कार्य सुरू असून या स्फोटाची चौकशी सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी