blood sucking alive dinosaur ऑस्ट्रेलियात आढळला रक्त पिणारा जिवंत डायनोसॉर

blood sucking alive dinosaur found in Australia ऑस्ट्रेलियातील मार्गरेट नदीच्या परिसरात पर्यटकांना मार्गदर्शन करणारा टूर गाइड सीन ब्‍लॉकसिडजे याच्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला यश आले.

blood sucking alive dinosaur found in Australia
ऑस्ट्रेलियात आढळला रक्त पिणारा जिवंत डायनोसॉर 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियात आढळला रक्त पिणारा जिवंत डायनोसॉर
  • लॅम्प्रेझ (Lampreys) नावाचा मासा
  • दातांच्या मदतीने लॅम्प्रेझ (Lampreys) मासा समोरच्याचे रक्त शोषून घेतो

blood sucking alive dinosaur found in Australia । मेलबर्न: ऑस्ट्रेलियातील मार्गरेट नदीच्या परिसरात पर्यटकांना मार्गदर्शन करणारा टूर गाइड सीन ब्‍लॉकसिडजे याच्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला यश आले. अखेर नदीत लॅम्प्रेझ (Lampreys) नावाचा मासा आढळला. या माशाला जिवंत डायनोसॉर (Alive Dinosaur) किंवा रक्त पिणाऱ्या ईलच्या रुपातही ओळखले जाते.

इतर माशांप्रमाणे लॅम्प्रेझ (Lampreys) माशाला तोंड असे नसते. एखाद्या पाइपसारखे लांबलचक शरीर असलेल्या या माशाच्या एका टोकाला वर्तुळाकार आकारात अनेक लहान-मोठे टोकदार दात असतात. या दातांच्या मदतीने लॅम्प्रेझ (Lampreys) मासा समोरच्याचे रक्त शोषून घेतो आणि जगतो. पृथ्वीवर डायनोसॉर असल्यापासून लॅम्प्रेझ (Lampreys) मासा पाण्यात होता. आता हा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

ऑस्ट्रेलियातील मार्गरेट नदीत काही ठिकाणी लॅम्प्रेझ (Lampreys) मासा आढळत होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या संदर्भात सीन ब्‍लॉकसिडजे याला माहिती दिली होती. पण मागील काही वर्षांमध्ये हा मासा बघितल्याचे कोणीही सांगितले नव्हते. यामुळे सीन ब्‍लॉकसिडजे मार्गरेट नदीत लॅम्प्रेझ (Lampreys) मासा शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली. तब्बल वीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर सीन ब्‍लॉकसिडजे याला लॅम्प्रेझ (Lampreys) मासा दिसला.

लॅम्प्रेझ (Lampreys) माशाच्या हालचाली आणि त्याच्या दातांची रचना बघून कोणाच्याही मनात दहशत बसेल. या दहशतीमुळेच लॅम्प्रेझ (Lampreys) माशाला जिवंत डायनोसॉर किंवा रक्त पिणाऱ्या ईलच्या रुपातही ओळखले जाते, असे टूर गाइड सीन ब्‍लॉकसिडजे याने स्थानिकांना सांगितले. पृथ्वीवर बदलत असलेल्या वातावरणामुळे लॅम्प्रेझ (Lampreys) मासा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असेही सीन ब्‍लॉकसिडजे याने सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी