Chambal river accident: ५० प्रवाशांसह बोट नदीत पलटली, अनेकजण बुडाल्याची भीती

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 16, 2020 | 14:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chambal river accident: राजस्थानमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. इथे चंबळ नदीत नाव बुडाल्याची बातमी येत आहे. या नावेत जवळपास ५० प्रवासी स्वार असल्याची माहिती मिळत आहे.

Boat capsized in Chambal river in Rajasthan, many passengers feared dead
Chambal river accident: ५० प्रवाशांसह बोट नदीत पलटली, अनेकजण बुडाल्याची भीती  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राजस्थानच्या कोटा चंबळ नदीत नाव उलटली, नावेत अनेक लोक होते स्वार
  • काही लोकांना पोहत किनाऱ्यावर पोहोचण्यात मिळाले यश
  • जिल्हा आणि राज्य प्रशासनाकडून बचावकार्यासाठी आवाहन

नवी दिल्ली: राजस्थानच्या (Rajasthan) चंबळ नदीत (Chambal river) नाव उलटल्याची (boat capsized) बातमी समोर येत आहे. या नावेत जवळपास ५० प्रवासी असल्याची माहिती मिळत (around 50 passengers were on board) आहे. खासदार हनुमान बेनीवाल (MP Hnuman Beniwal) यांनी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडे मागणी (appeal to district and state administration) केली आहे की त्यांनी तात्काळ बचावकार्यात सहकार्य (cooperate in rescue operations) करावे. खतोलीजवळ चंबळ नदीत बुडालेल्या या नावेतील (boat capsized near Khatoli in Chambal river) ५० यात्रेकरू (50 pilgrims) गोठडा कलाजवळ कमलेश्वर धामला जात असताना ही दुर्घटना (incident when pilgrims were going to Kamaleshwar Dham near Gothada Kala) घडली. याठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती, ज्यातील लोकांनी बहुतेक लोकांना वाचवले (most people were saved by huge crowd gathered), पण अनेकजण बुडाल्याची शक्यताही (possibility of drowning of many) व्यक्त केली जात आहे.

चंबळ नदीत मृत्यूचा खेळ

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की नावेत क्षमतेपेक्षा अधिक लोक स्वार होते. नदीत अचानक जलद लाटा आल्या आणि नाव उलटली. या घटनेचा व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की लोक पोहत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की पहिली प्राथमिकता ही लोकांना वाचवणे ही आहे. घटनास्थळी पाणबुड्यांना पाठवण्यात आले आहे जेणेकरून लोकांना बाहेर काढता येईल. तपासाच्या आघाडीवर या नावेच्या मालकाचा पत्ता लागला आहे आणि त्याने नावेच्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांना नावेत बसवले होते का याची चौकशी चालू आहे.

नदीच्या वेगवान प्रवाहामुळे झाला अपघात

जाणकारांनी सांगितले आहे की चंबळ नदीमध्ये असे अपघात होत असतात. चंबळच्या वरील प्रवाहाची आणि आतील धारांची गती वेगवान असते. एखादा नावाडी सतर्क नसेल किंवा नावेवर क्षमतेपेक्षा जास्त लोक स्वार असतील तर अशा दुर्घटना होतात. सध्या चंबळ नदीच्या पाण्याचा स्तर पावसाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे नावेत क्षमतेपेक्षा अधिक लोक स्वार होते. या नावेने घेतलेल्या वळणामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी