Boat full of passengers drowned: उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांदा जिल्ह्यात यमुना नदीत प्रवासी बोट उलटली आहे. प्रवासी बोट उलटल्याने २० जण बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले आहे. (Boat Capsized in Yamuna river banda uttar pradesh fear of 20 people drowned read in marathi)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बोट फतेहपूर येथून मारका गावाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. बोटीमधून एकूण ३० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. यापैकी ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतकांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
UPDATE | 11 rescued while 3 dead, including 2 women & a child in the Marka boat capsized tragedy, reported earlier today: Banda Police — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 11, 2022
A boat, full of passengers, going from Fatehpur to Marka village was capsized around 3pm. https://t.co/A8QtFsYsun
असं म्हटलं जात आहे की, नदी पार करत असताना भवऱ्याच्या ठिकाणी बोट उलटली. नायब तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. बुडालेल्या प्रवाशांचा शोध सुरू आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने नागरिक आपल्या नातेवाईकांकडे बोटीने निघाले होते आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे सर्वत्र एकच शोककळा पसरली आहे.
अधिक वाचा : पहिल्या मुलीचा हुंड्यासाठी खून, दुसऱ्या मुलीलाही घातली मागणी! नकार दिल्यावर केलं गुन्हेगारी कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. बोट उलटल्यानंतर आठ जण हे पोहत नदीबाहेर आले. एकूण ११ जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले आहे. तर अद्यापही २० जण बेपत्ता आहेत.
या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफला तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचेही निर्देश दिले. तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत, बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले.