Sri Lanka explosions: श्रीलंका बॉम्बस्फोटप्रकरणी बॉलिवूड सेलिब्रेटींकडून दुःख व्यक्त

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 21, 2019 | 19:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Srilanka blast: श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी ८ जागांवर साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातं आहे. बॉलिवूडकरांनी देखील ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे.

Sri lanka blast
Sri Lanka explosions: श्रीलंका बॉम्बस्फोटप्रकरणी बॉलिवूड सेलिब्रेटींकडून दुःख व्यक्त  |  फोटो सौजन्य: Times Now

Sri lanka bomb blast: श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटानं संपूर्ण जग हादरलं आहे. या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी चौकशी सुरू आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. भारत सरकारनं देखील बॉम्बस्फोटाचा निषेध करत श्रीलंकेला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बॉलिवूड स्टार्संनी देखील या बॉम्बस्फोटावर आपलं शोक व्यक्त केला आहे. 

या यादीत अनुष्का शर्मा, जॅकलीन फर्नांडिस, रविना टंडन, आर माधवन सारख्या स्टार्संनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. बॉलिवूड एक्ट्रेस अनुष्का शर्मानं देखील ट्विट करून बॉम्बस्फोट धक्कादायक असल्याचं म्हणत दुःख व्यक्त केलं आहे. अनुष्कानं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, श्रीलंकामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मला खूप दुःख झालं आहे. दुःख, धक्कादायक, वेदनानी भरलेल्या या क्षणासाठी आम्ही देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. 

यासोबतच श्रीलंकामध्ये राहणारी जॅकलीन फर्नांडिसनं दुःख व्यक्त करत ट्विट केलं की, श्रीलंकामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी खूप दुःख वाटतंय. ही गोष्ट खूप दुर्देवी आहे की हे कोणी पाहू शकत नाही आहे की ही हिंसा एक चेन रिअॅक्शनसारखी आहे. अशा गोष्टी थांबवणे गरजेचं आहे. जॅकलीन व्यक्तिरिक्त हुमा कुरैशीनं देखील ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. हुमानं लिहिलं की, #EasterSunday च्या दिवशी चर्च जाणाऱ्या कुटुंबियांना आणि मुलांवर हल्ला झालेल्यासाठी किती वाईट दिवस आहे. हे खूप भयानक आहे. आपल्या जगात हे काय होतंय. 

रविना टंडननं देखील श्रीलंका बॉम्बस्फोटप्रकरणी ट्विट केलं आहे. देशात हे सगळं बघून खरंच दुःख होतं. जे वर्षांनुवर्ष मेहनत आणि कष्ट करून पुढे जातात. आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम करतात. मात्र याप्रकारच्या घटना लोकांच्या मनावर निशाण सोडून जातात. प्रार्थना करते की या घटनेतून लोकं लवकरच सावरतील #srilanka. 

श्रीलंकेत तब्बल आठ साखळी बॉम्बस्फोट झाले असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये १६० जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. पहिला स्फोट हा कोलंबोच्या कोछीकडे येथील सेंट एन्थनी चर्चमध्ये झाला तर दुसरा स्फोट हा कटाना येथील एका दुसऱ्या चर्चमध्ये झाला. याशिवाय शांगरी-ला हॉटेल आणि किंग्सबरी हॉटेल येथील बॉम्बस्फोट झालं असल्याचं समजतं आहे. या बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ज्यावेळी लोक ईस्टर संडेच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये एकत्र आले होते. त्याचवेळी हा स्फोट घडवण्यात आले. श्रीलंकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला बॉम्बस्फोट हा स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:४५ वा. झाला. 

दरम्यान  या बॉम्बस्फोटप्रकरणी भारतानं निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राष्ट्रपती रामनथा कोविंद आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याशी फोनवर चर्चा करून देशवासियांकडून त्यांचं सांत्वन केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Sri Lanka explosions: श्रीलंका बॉम्बस्फोटप्रकरणी बॉलिवूड सेलिब्रेटींकडून दुःख व्यक्त Description: Srilanka blast: श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी ८ जागांवर साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातं आहे. बॉलिवूडकरांनी देखील ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे.
Loading...
Loading...
Loading...