West Bengal: पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये दुर्गा मुर्तीचं विसर्जन करुन परतणाऱ्या जमावावर बॉम्ब हल्ला

पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये काही लोकांनी शनिवारी रात्री 'दुर्गा मूर्ती विसर्जन' करुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला केला.

Bomb attack on a returning crowd after immersing a Durga idol in Durgapur
दुर्गा मुर्तीचं विसर्जन करुन परतणाऱ्या जमावावर बॉम्ब हल्ला   |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये काही लोकांनी शनिवारी रात्री 'दुर्गा मूर्ती विसर्जन' करुन परतणाऱ्या जमावावर देशी बॉम्बने हल्ला केला. या घटनेनंतर त्या परिसरात मोठी खळबळ माजली आहे.  या घटनेनंतर गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीच्या आधारे असे सांगितले जात आहे की मूर्तीचे विसर्जन करून परतणाऱ्या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. दोन्ही गटांवर  दगडफेक, तोडफोड आणि एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हा हल्ला दुर्गापूरच्या अन्नपूर्णा भागात झाला असून दुर्गा मूर्ती विसर्जन करून परतत असताना हा हल्ला करण्यात आला.

दरम्यान हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.असे म्हटले जाते की दारूच्या पेमेंटवरून दोन गटांमध्ये भांडण झाले, एक गट दुर्गा विसर्जनानंतर परतत होता. इतक्यात दुसरा गट तेथे आला आणि दारू विकत घेण्यासाठी पैसे मागू लागला. त्यानंतर दोन गटांमध्ये भांडण झाले, असे म्हटले जाते की प्रकरण इतके वाढले की दुसऱ्या गटाने बॉम्बने हल्ला केला.

लोकांच्या वाहनांची तोडफोड केल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहेया हल्ल्यात काही जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस म्हणाले की,  हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही, ते सर्व फरार असल्याचे लक्षात घेण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत, संपूर्ण परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी