इराणमधून चीनला जात असलेल्या विमानाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुखोई आकाशात, भारताच्या हवाई दलाचा हाय अलर्ट

Bomb threat onboard Iranian passenger jet over Indian airspace : इराणमधून चीनला जात असलेल्या प्रवासी विमानात बॉम्ब असल्याचे वृत्त येताच भारतात हवाई दलाने हाय अलर्ट दिला आहे.

Bomb threat onboard Iranian passenger jet over Indian airspace
तेहरान-ग्वांगझू विमानावर लक्ष ठेवण्यासाठी सुखोई आकाशात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • इराणमधून चीनला जात असलेल्या विमानाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुखोई आकाशात
  • तेहरान-ग्वांगझू विमानावर लक्ष ठेवण्यासाठी सुखोई आकाशात
  • भारताच्या हवाई दलाचा हाय अलर्ट

Bomb threat onboard Iranian passenger jet over Indian airspace : इराणमधून चीनला जात असलेल्या प्रवासी विमानात बॉम्ब असल्याचे वृत्त येताच भारतात हवाई दलाने हाय अलर्ट दिला आहे. सुखोई (SU 30 MKI) विमानं इराणच्या प्रवासी विमानापासून सुरक्षित अंतर राखून उडत आहेत. इराणच्या विमानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. भारताने इराणच्या महान एअरलाईन्स कंपनीच्या या विमानाला दिल्लीत उतरण्याची परवानगी नाकारली आहे. यामुळे विमान थेट चीनच्या दिशेने रवाना झाले आहे.

Stampede: फुटबॉल मॅच ठरली जीवघेणी, दोन क्लबच्या समर्थकांमध्ये हिंसाचार; चेंगराचेंगरीत 127 जणांचा मृत्यू

इराणच्या महान एअरलाईन्स कंपनीच्या प्रवासी विमानाने तेहरान येथील विमानतळावरून उड्डाण केले. हे विमान चीनमध्ये ग्वांगझू येथे जात आहे. या विमानाच्या वैमानिकाने दिल्लीच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमानात बॉम्ब आहे त्यामुळे दिल्लीत उतरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. ही मागणी फेटाळण्यात आली. विमान उतरविणे आवश्यक असेल तर राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उतरावे, असे दिल्लीच्या हवाई नियंत्रण कक्षाने सांगितले. यानंतर वैमानिकाने भारतात उतरत नसल्याचे सांगितले. विमान चीनच्या दिशेने रवाना झाले. वैमानिकाच्या या वर्तनाची माहिती हवाई नियंत्रण कक्षाने भारताच्या हवाई दलाला दिली. यानंतर भारताच्या हवाई दलाने हाय अलर्ट जाहीर केला. 

मुलायमसिंह यादव हॉस्पिटलमध्ये

सुखोई विमानांनी इराणच्या प्रवासी विमानापासून सुरक्षित अंतर राखून आकाशातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. इराणच्या प्रवासी विमानाने प्रवासाचा आधी निश्चित केलेला मार्ग बदलेला नाही. पण भारताने खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दलाला अलर्टवर ठेवले आहे. इराणच्या प्रवासी विमानात बॉम्ब आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी