बूस्टर डोससाठी खासगी हॉस्पिटलमध्ये २२५ रुपयांत मिळेल लस

booster dose will be available at private hospital for Rs 225 : कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसचा बूस्टर डोस प्रत्येकी २२५ रुपयांत उपलब्ध आहे. खासगी हॉस्पिटल बूस्टर डोस देण्यासाठी जास्तीत जास्त १५० रुपये 'सर्व्हिस चार्ज' अर्थात सेवाशुल्क आकारू शकतील. यामुळे बूस्टर डोससाठी नागरिकांना जास्तीत जास्त ३७५ रुपये मोजावे लागतील.

booster dose will be available at private hospital for Rs 225
बूस्टर डोससाठी खासगी हॉस्पिटलमध्ये २२५ रुपयांत मिळेल लस 
थोडं पण कामाचं
  • बूस्टर डोससाठी खासगी हॉस्पिटलमध्ये २२५ रुपयांत मिळेल लस
  • कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसचा बूस्टर डोस प्रत्येकी २२५ रुपयांत उपलब्ध
  • खासगी हॉस्पिटल बूस्टर डोस देण्यासाठी जास्तीत जास्त १५० रुपये 'सर्व्हिस चार्ज' अर्थात सेवाशुल्क आकारू शकतील

booster dose will be available at private hospital for Rs 225 : नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन किमान नऊ महिने झाले असलेल्या अठरा किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना भारतात खासगी हॉस्पिटलमध्ये स्वखर्चाने बूस्टर डोस घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. बूस्टर डोस ऐच्छिक आहे. देशात रविवार १० एप्रिल २०२२ पासून खासगी हॉस्पिटलमध्ये बूस्टर डोस मिळेल. आधी ज्या लसचे दोन डोस घेतले आहेत त्याच लसचा बूस्टर डोस घ्यावा; असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसचा बूस्टर डोस प्रत्येकी २२५ रुपयांत उपलब्ध आहे. खासगी हॉस्पिटल बूस्टर डोस देण्यासाठी जास्तीत जास्त १५० रुपये 'सर्व्हिस चार्ज' अर्थात सेवाशुल्क आकारू शकतील. यामुळे बूस्टर डोससाठी नागरिकांना जास्तीत जास्त ३७५ रुपये मोजावे लागतील.

Corona : दिल्ली-महाराष्ट्रासह 5 राज्यांना केंद्राचे पत्र; परिस्थिती हाताळण्यासाठी नवीन गाइडलाइन तयार करण्याच्या सूचना

18+ वयोगटातील सर्वांना मिळेल तिसरा डोस

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या धोक्यादरम्यान, सरकारने जाहीर केले आहे की 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाईल. आरोग्य मंत्रालयाने याला प्रिकॉशन डोस असे नाव दिले आहे. हे आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना विनामूल्य दिले जाईल, तर उर्वरित प्रौढांना पैसे द्यावे लागतील. हा डोस खासगी लसीकरण केंद्रांवर दिला जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी