बोरिस जॉन्सन राजीनामा देणार, हंगामी पंतप्रधान होणार

Boris Johnson to quit as UK ruling party leader, to continue as PM until new leader is elected : इंग्लंडच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते बोरिस जॉन्सन (५८) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे.

Boris Johnson to quit as UK ruling party leader, to continue as PM until new leader is elected
बोरिस जॉन्सन राजीनामा देणार, हंगामी पंतप्रधान होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बोरिस जॉन्सन राजीनामा देणार, हंगामी पंतप्रधान होणार
  • नव्या पंतप्रधानांची निवड होईपर्यंत बोरिस जॉन्सन हंगामी पंतप्रधान म्हणून काम करतील
  • बोरिस जॉन्सन राजीनामा देण्याआधी देशाला उद्देशून विशेष भाषण करणार

Boris Johnson to quit as UK ruling party leader, to continue as PM until new leader is elected : इंग्लंडच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते बोरिस जॉन्सन (५८) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. आजच ते पदाचा राजीनामा सादर करतील आणि हंगामी पंतप्रधान म्हणून काम सुरू करतील. नव्या पंतप्रधानांची निवड होईपर्यंत बोरिस जॉन्सन हंगामी पंतप्रधान म्हणून काम करतील. 

तीन दिवसांत जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४० सदस्यांनी राजीनामे दिले. यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर पदाचा राजीनामा देण्यासाठीचा दबाव वाढला. हा दबाव झुगारून देणे कठीण झाल्यामुळे बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा तसेच पार्लमेंटमधील पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. थोड्याच वेळात राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण होणार आहे. 

बोरिस जॉन्सन राजीनामा देण्याआधी देशाला उद्देशून विशेष भाषण करणार आहेत. यानंतर ते राजीनामा देण्याची औपचरिकता पूर्ण करतील. पण ऑक्टोबर २०२२ पर्यंत बोरिस जॉन्सन हेच इंग्लंडचे हंगामी पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करणार आहेत.

जूनमध्ये पार केला होता बहुमत चाचणीचा अडथळा

जून २०२२ मध्ये बोरिस जॉन्सन सरकारने बहुमत चाचणीचा अडथळा पार केला होता. जॉन्सन सरकारला २११ जणांचे समर्थन मिळाले होते तर १४८ जणांनी विरोध केला होता. बहुमताची चाचणी पार केल्यामुळे सरकार सुरक्षित आहे अशी चर्चा होती. पण जॉन्सन यांनी महत्त्वाची जबाबदारी दिलेल्या एका खासदारावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. गंभीर आरोप होऊनही संबंधित खासदाराचा बोरिस जॉन्सन यांनी  बचाव केला. यामुळेच परिस्थिती बिघडली. धडाधड मंत्र्यांनी राजीनामे सादर केले आणि बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठीचा दबाव वाढला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी