प्रेमास नकार दिल्याने संतप्त तरुणाने तरुणीवर रॉकेल टाकून पेटवलं, दोघांचाही होरपळून मृत्यू

Boy set girl on fire: प्रेमास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरुणाने तरुणीवर रॉकेट टाकून तिला पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तरुणीसह तरुणाचाही होरपळून मृत्यू झाला आहे. 

boy set girl fire reject proposal kerala ernakulam crime news
प्रेमास नकार दिल्याने संतप्त तरुणाने तरुणीवर रॉकेल टाकून पेटवलं, दोघांचाही होरपळून मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • प्रेमास तरुणीने दिला नकार
  • संतप्त तरुणाने तरुणीला पेटवलं
  • तरुणीला पेटवताना तरुणही होरपळला
  • तरुण आणि तरुणी दोघांचाही आगीत होरपळून मृत्यू

केरळ: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीला प्रपोज केलं. मात्र, तरुणीने नकार देताच संतप्त झालेल्या तरुणाने त्या तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील एर्नाकुलमच्या कक्कानाड येथी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कक्कानाड येथे राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर निधिन नावाचा तरुण प्रेम करत होता. निधिनने या तरुणीला प्रपोज केलं मात्र, तिने प्रेमास नकार दिला आणि त्यानंतर निधिनने तिला जिवंत जाळले.

ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निधिन हा रात्रीच्या सुमारास त्या तरुणीच्या घरी पोहोचला. निधिनने तरुणीच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि घरातील सर्व सदस्यांना झोपेतून उठवले. घराचा दरवाजा त्या तरुणीच्या वडिलांनी उघडला. दरवाजा उघडताच निधिनने त्या तरुणीला भेटायचं असल्याचं म्हटलं. त्याच दरम्यान अल्पवयीन तरुणी घरातील दुसऱ्या रूममधून बाहेर आली.

जेव्हा पीडित तरुणी दुसऱ्या रूममधून बाहेर आली तेव्हा आरोपी निधिनने तिच्यावर रॉकेट टाकून पेटवलं. आगीच्या झळा इतक्या भयंकर होत्या की त्यात आरोपी निधिनही होरपळा. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पीडित तरुणीसह आरोपी निधिन या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचरा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

डॉक्टरांनी पीडित तरुणीला आणि आरोपी निधिन या दोघांनाही मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने निधिनच्या प्रेमाचं प्रपोजल नाकारलं आणि त्यामुळे संतप्त झालेल्या निधिन याने त्या तरुणीला जिवंत जाळलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...